वक्फ बोर्ड जमीन घोटाळाप्रकरणी ईडीचे छापे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वक्फ बोर्ड जमीन घोटाळाप्रकरणी ईडीचे छापे

मुंबई : महाराष्ट्रातील वक्फबोर्ड जमीन घोटाळा प्रकरणी सक्त वसुली संचनालयाने (ईडी), गुरुवारी पुणे आणि औरंगाबाद येथे धाडी टाकल्यात. वक्फ बोर्डाच्या जमीन

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून
अखेर शितल गादेकर प्रकरणी ॲड. नरेश मुनोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Jr. NTR च्या फॅन्सचा धिंगाणा, थिएटरला लागली आग

मुंबई : महाराष्ट्रातील वक्फबोर्ड जमीन घोटाळा प्रकरणी सक्त वसुली संचनालयाने (ईडी), गुरुवारी पुणे आणि औरंगाबाद येथे धाडी टाकल्यात. वक्फ बोर्डाच्या जमीन खरेदी-विक्रीच्या संदर्भात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, वक्फ बोर्डच्या जमीन घोटाळ्याबाबत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही छापेमारी केली जात आहे.
वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या गैरव्यवहाराप्रकरणी मुंबई, पुणे, औरंगाबादसह सात ठिकाणी ईडीने या धाडी टाकल्या आहेत. याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. वक्फ बोर्ड हा विभाग सध्या राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येतो. वक्फ बोर्डाच्या जमिनी भाडेतत्त्वावर देता येतात मात्र त्याची विक्री करता येत नाही. मात्र औरंगाबादमधील काही उद्योगपतींनी त्या इमारती भाडेतत्त्वार घेऊन त्यावर टोलेजंग इमारतीही बांधल्या आहेत. त्या इमारतीतील गाळे थेट रजिस्ट्री, खरेदीखत करून विकल्यादेखील आहेत. हा गैर व्यवहार शेकडो कोटींचा झाला होता. यासंदर्भातील तक्रारी ईडीकडे दाखल झाल्या होत्या. याविरोधात ईडीने तपाससत्र सुरु होतं. त्यानुसार औरंगाबादमध्येही ही धाड पडली आहे.या धाडींसाठी ईडीच्या 54 अधिकार्‍यांचे पथक औरंगाबादमध्ये दाखल झाले असून व्यावसायिक आणि उद्योजकांची घरे व आस्थापनांवर छापे टाकले जात आहेत. पुण्यातील बंडगार्डन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात या घोटाळ्याच्या प्रकरणात पकडलेले काहीजण हे वक्फ बोर्डाचे विश्‍वस्त होते. मात्र, बोर्डाच्या अन्य काही अधिकार्‍यांनी या मालमत्तांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्या विभागांतर्गत वक्फ बोर्ड येत असून सातत्याने चर्चेत असलेले नवाब मलिक यांच्यावर येत्या काळात ईडीच्या कारवाईची टांगती तलवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

औरंगाबादमध्ये पद्माकर मुळे यांच्याविरोधात कारवाई
औरंगाबाद शहरात बड्या उद्योजकांविरोधार ईडीने एकापाठोपाठ एक असे छापे टाकले आहेत. आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर ही कारवाई सुरु आहे, हे गोपनीय होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीचे छापे पडल्याचा खुलासा झाला आहे. तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे. या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर ही धाड पडली आहे. बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत. पद्माकर मुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार कुटुंबियांशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत

ईडी घरी आली तर स्वागत करु : नवाब मलिक
वक्फ बोर्ड जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने छापे मारल्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. मलिक म्हणाले की, आता जी छापेमारी सुरू आहे. काही चॅनलवाल्यांनी सांगितलं की मलिकच्या घरापर्यंत ईडी येणार आहे. आली तर आम्ही स्वागत करू. मात्र ताबूत इनाम ट्रस्टप्रकरणी छापेमारी होत आहे. त्यात पुण्यात एमआयडीसीत 5 हेक्टर 51 आर जमीन अ‍ॅक्विजेशन करून ऑफिसरकडे पैसे जमा केले. इम्तियाज हुसैन शेख आणि इतर ट्रस्टींनी त्यांना 7 कोटीच्या 76 लाख 98 हजार 250 रुपये ताब्याचे पैसे दिल्याचे मलिक यांनी सांगितले.

COMMENTS