लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र कोरोना नियंत्रणासाठी वरदान ठरतील-घोडके

Homeअहमदनगर

लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र कोरोना नियंत्रणासाठी वरदान ठरतील-घोडके

कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आलेले नागरिकांचा घशातील श्राव चा अहवाल दोन ते चार दिवसांत येत असतो.

दैनिक लोकमंथन l परदेशातून पन्नास हजार टन ऑक्सिजनची आयात
जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीत संगमनेर तालुका जिल्ह्यात प्रथम
आठ जिल्ह्यांत निर्बंध ; पुणे, मुंबई, नगरचाही समावेश; कडक टाळेबंदी

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून आलेले नागरिकांचा घशातील श्राव चा अहवाल दोन ते चार दिवसांत येत असतो…अशा परिस्थितीत ती व्यक्ती श्राव दिल्यानंतर आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त होवून जाते.ती व्यक्ती बाधित झाली तर इतरांना बाधित करण्याची शक्यता असते.अशा व्यक्तींकरिता शहरी व ग्रामीण भागात विलिनीकरण केंद्र लोकसहभागातून उभारण्यात आले तर कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे…


कोपरगाव शहर आणि ग्रामीण भागात वाढता कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी लोकसहभागातून स्वतंत्र विलिनीकरण केंद्र उभारण्यासाठी स्थानिक लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके यांनी केले आहे.


कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागातील सार्वजनिक उत्सव मंडळे, दानशूर व्यक्ती, स्वयं सेवी संस्था, समाजसेवक,आजी,माजी,उत्सुक नगरसेवक यांनी एकत्र येऊन किंवा आपापल्या प्रभाग किंवा लोकवस्तीत कोरोना संसर्ग विलिनीकरण केंद्र शासनाची कुठलीही मदत न घेता (मात्र पुर्व परवानगी घेऊन)उभारु शकतात.जेणे करुन रुग्णाला आपल्याच प्रभागातील विलिनीकरण केंद्रावर राहिल्यास माणसिक द्रुष्ट्या तणाव मुक्त राहुन बरे होण्यास मदत होते.


खालील प्रमाणे त्या केंद्रावर आपणच उपलब्ध करुन द्यावे…
१) प्रशस्त हाॅल/सुमारे ५० लोक आरामात राहू शकतात असे छत असलेले ठिकाण निवडावे.
२) त्या ठिकाणी महिला आणि पुरुष या मध्ये पार्टीशन करुन सम-समान बेड(पलंग) उपलब्ध करुन द्यावे.तसेच महिला आणि पुरुष यांना स्वतंत्र शौचालय येथे मुबलक पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे.तसेच बाथरूम असणे आवश्यक आहे.तेथे स्वच्छता कर्मचारी आपले स्तरावर नेमावा.
३) तेथे लाईट व्यवस्था असणे आवश्यक आहे.तसेच मोबाईल चार्जिंग करता येईल अशी व्यवस्था असावी.
४) पिण्याचे पाण्याची व्यवस्था असावी.वापरण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.
५) शासन यंत्रणेला कळविलेला आणि कुठलीही लक्षणे नसलेला किंवा अतिशय सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्ती (संभाव्य रुग्णालाच) तेथे वैद्यकीय सल्ल्याने राहाता येईल.परस्पर कोणालाही राहाता येणार नाही.
६) तेथे सेवाभावी मनमिळावू आणि समजदार जनसंपर्क अधिकारी २४ तास(८-८ तास सेवाभावी वेळ देवून) नेमावेत.
७) घषातील श्राव दिलेल्या नागरिकाने आपले स्वता:चे अंथरुण, पांघरूण सोबत आणावे आणि आपला संस्थानिक विलिनीकरण कालावधी संपल्यानंतर परत सोबत घेऊन जावे. ८) संस्थानिक विलिनीकरणात असलेल्या व्यक्तीने (संशयित रुग्णाने) आपले सोबत टुथ पेस्ट,ब्रश,अंगावरील कपड्यांचे दोन सेट सोबतच आणावे.विलगीकरण कालावधी संपल्यानंतर घरी गेल्यावर सोबतचे कपडे स्वतः डिटर्जंट पावडर मध्ये स्वतः धुवावेत.तसेच ईतर सोबतच्या वस्तू निर्जंतुकीकरण करुन घ्याव्यात.
९) रुग्णाला सकाळचा नाश्ता,दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण घरातील इतरांनी दैनंदिन डिस्पोजेबल मध्ये आणून द्यावे.या बाबत आवश्यक ती काळजी घ्यावी.
१०) विलिनीकरण केंद्रावर राहण्यासाठी आलेल्या नागरिकास(संशयित रुग्ण) सकाळचा चहा संबंधित विलिनीकरण केंद्र संचालकांनी शक्य असल्यास उपलब्ध करून द्यावा.
११) कुठलीही लक्षणे नसलेला किंवा सौम्य लक्षणे असलेला घषातील श्राव दिलेल्या नागरिकांने (संशयित रुग्णाने) सरकारी यंत्रणेमार्फत मिळणारे गोळ्यांचे किट सोबत आणल्यावर नियमित गोळ्या औषधांचे तसेच संबंधिताला ईतर आजार असल्यास ती औषधे सोबत आणुन त्यांचे सेवन करणे रुग्णांची वैयक्तिक जबाबदारी आहे.जेणे करुन ती व्यक्ती लवकर बरी होवून घरी सुखरूप जाईल.
१२) विलिनीकरण केंद्रावर आलेल्या (संशयित रुग्णांची) नियमित तपासणी होणे आवश्यक आहे.केंद्र संचालकाने आपल्या परिसरातील छोटे-छोटे डाॅक्टरांचे दवाखाने आहे.कोरोना संकटात या छोट्या-छोट्या डॉक्टरांनी माफक दरात दिलेले योगदान दिले आहे…त्यातील दोन-तीन डॉक्टर त्या प्रभागातील लोकांकरिता सकाळ-दुपार-रात्री समाविष्ट (संशयित रुग्ण) भेट घेऊन त्यांची नियमित तपासणी करतील.त्यांचे सेवेबद्दल मानधन त्यांना आपल्या केंद्र पातळीवर संचालक संस्थेने द्यावे.छोट्या डॉक्टरांनी संशयित रुग्ण स्थिती गंभीर वाटत असल्यास त्यास पुढील उच्च स्तरीय उपचारासाठी योग्य मार्गदर्शन आणि समुपदेशन करावे. 
१३) केंद्रावर एक रजिस्टर नोंदणी वही असावी.त्यावर वैद्यकीय सल्ल्यानुसार काॅलम आखणी करुन रुग्णांचे नाव,वय यासह त्यांचे इतर नोंदणी ठेवावी.हे वही  शासनाचे नियुक्त अधिकारी कधीही तपासू शकतात.तेव्हा त्याच संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहिले केंद्र संचालकांची जबाबदारी आहे.
१४) रुग्णाने या विलिनीकरण केंद्राने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.घषातील श्राव निगेटिव्ह आलेवर संबंधित नागरिकांने घरी जावे.परंतू पाॅझेटिव्ह आलेल्या नागरिकांने वैद्यकीय अधिकारी यांचे सल्याने तातडीने पुढील उपचार सुरू करावे… दिरंगाई टाळून यातून बरे होवू हा आत्मविश्वास रुग्णाने बाळगावा…
१५) विलिनीकरण केंद्रावर नियमित स्वच्छता कर्मचारी आपले स्तरावर ठेवावा.त्या साठी येणारा खर्च केंद्र संचालक समुहाने करावा.तसेच तेथील कचरा योग्य पध्दतीने स्वतंत्र कचरागाडीत द्यावा.
१६) विलिनीकरण केंद्रावर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.तसेच दैनंदिन स्वच्छता कर्मचारी आपले स्तरावर नेमावा.व त्यांचे मानधन आपापले स्तरावर अदा करावे.
१७) या सर्वांवर नियंत्रणासाठी विलिनीकरण केंद्राची एक छोटी समिती तयार करावी.त्याचा प्रमुख हा त्या केंद्रावर नियमित तपासणी करणारा डॉक्टर/नियमांचे पालन करणारा सेवाभावी व्यक्ती असावा.
१८) विलिनीकरण केंद्रावर दाखल झालेल्या नागरिकांने (संशयित रुग्ण)हे सारे आपल्या सेवेसाठी आहे या जबाबदारीचे भान ठेवून संबंधित व्यवस्थेला सहकार्य करावे.परवानगी शिवाय बाहेर पडू नये.


या पध्दतीने ग्रामीण भागात प्रत्येक गांव पातळीवर स्वतंत्र विलिनीकरण केंद्र तयार होवून कोरोना संसर्ग प्रादुर्भाव नियंत्रणासाठी मदत ठरु शकतात. 


हीच वेळ आहे.स्थानिकांनी एकत्र येऊन गावांसाठी करण्याची.मला खात्री आहे.कोपरगांवकर या कोरोना संकटात एकत्र येऊन ही किमया साधून हे संकट परतावून लावतील.


एवढंच सांगेन की, छत्रपती शिवाजीराजे असते तर त्यांचे मावळ्यांनी काय केले असते.तेच आपल्याला करायचे आहे. भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आणि लोकशाहीचा आदर राखत सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायचे आहे.एक पाऊल कोरोना मुक्तीचे दिशेने.

COMMENTS