लाल माती कुस्ती केंद्राच्या आवाहनास प्रतिसाद

Homeमहाराष्ट्रसातारा

लाल माती कुस्ती केंद्राच्या आवाहनास प्रतिसाद

लोणंद, ता. खंडाळा येथील लाल माती कुस्ती केंद्राचे संस्थापक पैलवान नवनाथ शेंडगे वस्ताद यांनी लोकांना आपला वाढदिवस साजरा करत असताना नाहक खर्चास फाटा देऊन कुस्ती केंद्र येथे घडत व शिकत असलेल्या नव मल्लांना पौष्टिक आहार खाद्यपदार्थ फळे खुराक तसेच व्यायाम संबंधित साहित्य भेट देऊन साजरा करावा, असे आवाहन केले होते.

राज्य गारठले ; पिकांचे मोठे नुकसान ; उत्तर, मध्य पश्‍चिम, दक्षिण महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल
आपण सर्वजण काही प्रमाणात मनोरुग्ण ः राजन खान
तळेगाव मळे ग्रामस्थांची 178 व्या सप्ताहाची मागणी

वाढदिवसानिमित्त कुस्ती केंद्रास पौष्टिक खाद्य भेट

लोणंद / वार्ताहर : लोणंद, ता. खंडाळा येथील लाल माती कुस्ती केंद्राचे संस्थापक पैलवान नवनाथ शेंडगे वस्ताद यांनी लोकांना आपला वाढदिवस साजरा करत असताना नाहक खर्चास फाटा देऊन कुस्ती केंद्र येथे घडत व शिकत असलेल्या नव मल्लांना पौष्टिक आहार खाद्यपदार्थ फळे खुराक तसेच व्यायाम संबंधित साहित्य भेट देऊन साजरा करावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्या या आवाहनास चांगला प्रतिसाद दिला जात आहे. गणेश पाडसे यांनी विविध खर्चास फाटा देऊन स्वतःचा वाढदिवस हा नव मल्लांना पौष्टिक खाद्य भेट देऊन साजरा केला. तसेच यावेळी लाल माती कुस्ती केंद्राकडून त्यांचा वाढदिवस हा कलिंगड कापून अनोख्या पध्दतीने अगदी प्रेरणादायी पध्दतीने साजरा करताना शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, मंगेश माने, युवा नेते भुषण खरात, सागर खरात, पोलीस पाटील नंदकुमार खताळ, संदिप जगताप, दिपक आमटे, ऋषिकेश जाधव आदी मान्यवर व मल्ल उपस्थित होते. यावेळी लोणंदकरांनी लाल माती कुस्ती केंद्राच्या या आवाहनास चांगला प्रतिसाद द्यावा त्यांना चांगले सहकार्य करावे, अशी विनंती लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील व साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी व्यक्त केली.

COMMENTS