लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचण्यास मान्यता

Homeमहाराष्ट्रमुंबई - ठाणे

लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचण्यास मान्यता

’ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने ’भारत बायोटेक’च्या ला दोन ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनची क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे.

पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींना नोटीस
जेएनयूमध्ये मध्यरात्री तुफान राडा
मोहालीत इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

 नवी दिल्लीः ’ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने ’भारत बायोटेक’च्या ला दोन ते 18 वयोगटासाठी कोवॅक्सिनची क्लिनिकल चाचणी घेण्यास परवानगी दिली आहे. हैदराबादस्थित या कंपनीने म्हटले आहे, की ’भारत बायोटेक’ ही चाचणी 525 निरोगी स्वयंसेवकांवर करणार आहे. ही त्यांची दुसर्‍या आणि तिसर्‍या टप्प्यातील चाचणी असेल. 

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या कोरोनाबाबतच्या सबजेक्ट एक्सपर्ट कमिटीने कोव्हॅक्सिनची ट्रायल दोन ते 18 वयोगटासाठी केली जावी, याबाबत शिफारस केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने अशी माहिती दिली आहे, की या ट्रायल दरम्यान लस 28 दिवसांच्या अंतराने दोन डोसमध्ये स्नायूद्वारे दिली जाईल. कोव्हॅक्सिन डोसची सुरक्षितता, रिअ‍ॅक्टोजेनिसीटी आणि इम्युमोजेनिसीटीचे मूल्यांकन करण्यासाठी ही परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात सविस्तर विचार केल्यानंतर या तज्ज्ञांच्या पॅनेलकडून याबाबत शिफारस करण्यात आली होती.

COMMENTS