लखाबाई, येडाबाई, काळुबाई, सप्तशृंगी आई..गाडा निघाला देवीआईचा !

Homeमहाराष्ट्रनाशिक

लखाबाई, येडाबाई, काळुबाई, सप्तशृंगी आई..गाडा निघाला देवीआईचा !

सुनील क्षिरसागर विंचूर (निफाड) प्रतिनिधी :- भारतीय हिंदू संस्कृती परंपरेनुसार आषाढ हा महिना देवीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये लखाबाई, येडाबाई,

शहरातील 69 दिव्यांग व्यक्तींना पिवळ्या शिधापत्रिकेचे वाटप
जिल्हा परिषदेत दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्यांविषयी बैठक संपन्न
डॉ.आंबेडकर हे फक्त भारतरत्नच नव्हे तर विश्वरत्न : मंत्री छगन भुजबळ

सुनील क्षिरसागर विंचूर (निफाड) प्रतिनिधी :- भारतीय हिंदू संस्कृती परंपरेनुसार आषाढ हा महिना देवीचा महिना मानला जातो. या महिन्यामध्ये लखाबाई, येडाबाई, काळुबाई, सप्तशृंगी देवी, मर्याआई या देवींच्या नावाने देवीचे भगत-भक्तींन देवीचा देव्हारा घेऊन जवळपासचे गावो-गावी फिरतात. अशाच प्रकारे आषाढ महिन्यात आईचा गाडा हा प्रत्येक गावाच्या वेशीवर, शिवेवर आणला जातो आणि गाव गाव त्याची मान मानता करून पूजा करून शेवटी ह्या आईचे गाड्यांचे गंगेत विसर्जन केले जाते.
     आईचे गाडे साधारण आषाढ महिन्यात कोकण भागातून निघतात आणि प्रत्येक गावाच्या सीमेवर (शिवावर) आणून ठेवले जाते. अश्या प्रकारे प्रत्येक गाव पुढच्या गावाच्या सीमेवर ठेवले जाते.मातंग समाजातील व नाईक (आदिवासी) समाजातील नवरा-बायको अशा दोन जोडपे यांकडून या शिवेवर आलेल्या आईच्या गाड्यांची गावचे ग्रामस्थ व गावातील देवीचे भगत -भक्तींन या गाड्यांची विधिवत पूजा करून  ह्यां नवीन दोन जोडप्यांना नवीन कपडे, चपला, दक्षणा  देतात व नवीन लाकडी गाडा तयार करून त्या आलेल्या गाड्यांच्या पुढे या गावातील गाडा जोडला जातो आणि पुढच्या गावाच्या सीमेवर मंगळवार किंवा शुक्रवार या देवीच्या वाराच्या दिवसी वाजत-गाजत सवाद्य या दोन जोडप्यांची मार्फत पुढच्या गावच्या सीमेवर नेऊन ठेवतात. या देवीआईच्या गाड्यांची पूर्वापार चालत आलेली अशी धार्मिक दंतकथा आहे, की गावातील आलेले संकट, गावावर आलेली महामारी सारखे आजार हे आईचे गाडे गावावरील संकट आपल्या सोबत घेऊन जातात व पुढील वर्षापर्यंत गावावर संकट येऊ नये, म्हणून ही पूर्वापार चालत आलेली पारंपारिक प्रथा बऱ्याच वर्षापासून आज पर्यंत चालत आलेली आहे. हा सर्व विधी चा खर्च गावातील ग्रामस्थ व गावातील भगत- भक्तिंन या लोकांकडून यतासांग व्यवस्थितरीत्या आनंदाने पार पाडला जातो. परंतु आता बदलत्या काळानुसार जुन्या रुढी परंपरा लोप होत चालल्या आहेत.आता ढोल – ताश्याच्या गजरात मिरवणूक काढणेही बंद होत चालले आहे.चालु वर्षीतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जास्त लोकांत कार्यक्रमासही बंदी आहे. अशी माहिती विंचूर चे भगत शंकर दादा इंगळे व बाबुराव जाधव यांनी दिली आहे.

COMMENTS