रेमडेसिवीरचे घाणेरडे राजकीय नाट्य ; फडणवीस, दरेकरांचा पोलिसांच्या कारभारात हस्तक्षेप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमडेसिवीरचे घाणेरडे राजकीय नाट्य ; फडणवीस, दरेकरांचा पोलिसांच्या कारभारात हस्तक्षेप

पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला रेमडसिवीर इंजेक्शनच्या जादा साट्याबद्दल चौकशीसाठी बोलविल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिस ठाण्यांत जाऊन पोलिस अधिकार्‍यांना जाब विचारला. हे नाटय शनिवारी रात्री उशिरा चांगलेच रंगले.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी
संजय राठोड यांच्या उमेदवारीला विरोध कायम
शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह द्या

मुंबई / प्रतिनिधीः पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला रेमडसिवीर इंजेक्शनच्या जादा साट्याबद्दल चौकशीसाठी बोलविल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पोलिस ठाण्यांत जाऊन पोलिस अधिकार्‍यांना जाब विचारला. हे नाटय शनिवारी रात्री उशिरा चांगलेच रंगले. त्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस, दरेकर यांच्यावर कारवाई करण्याचे सूतोवाच केले आहे. 

बु्रक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच फडणवीस, दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. या वेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढेच नाहीत, तर यादरम्यान भाजप नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले. त्यानंतर सर्वजण वांद्रे-कुर्ला संकुलातील पोलिस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर अधिकार्‍याला सोडण्यात आले. या सर्व घडामोडीमोडींच्या वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, पोलिसांवर दबाव टाकणे योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, असा इशारा विरोधी पक्षनेत्यांना दिला. पोलिसांना मुंबईत जवळपास 50 हजार रेमडेसिवीर येत आहेत, याची माहिती मिळाली होती. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात बोलावले. फडणवीस, दरेकर आणि लाड यांनी या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावले आहे, असा सवाल केला. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले. या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकार्‍यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. रेमडेसिवीरचा हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता. या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे. केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. दरम्यान, कारवाईवर प्रश्‍चचिन्ह उपस्थित करत फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिल्यानंतर कारवाई करण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकार्‍याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे, असे ते म्हणाले. 

पोलिसांनीही साधी चौकशीही करू नये का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर या प्रकरणी टीका केली आहे. औषध कंपनीच्या संचालकांना सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला चौकशीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्‍न आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे माणसे मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करू नये का, असा सवाल त्यांनी केला.

पोलिस ठाण्याऐवजी दिल्लीत गेले असते तर बरे झाले असते

एका व्यावसायिकासाठी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर मध्यरात्री धाऊन जातात आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणतात हे आश्‍चर्यकारक आहे. रेमडेसिवीर मिळवून देण्यासाठी फडणवीस दिल्लीत गेले असते, तर अधिक चांगले झाले असते, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

COMMENTS