शेवगाव तालुका प्रतिनिधी दि. 12 महाराष्ट्राचा संपूर्ण भारतात अल्पावधीत नावलौकिक झालेल्या रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अहम
शेवगाव तालुका प्रतिनिधी दि. 12
महाराष्ट्राचा संपूर्ण भारतात अल्पावधीत नावलौकिक झालेल्या रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. अहमदनगर या आर्थिक संस्थेने सर्व बँकांचे व्यवहार आता रेणुकामाता मल्टीस्टेट च्या ए.टी.एम मशीन मध्ये स्विकारले जातील असे रेणुकामाता मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष मा. डॉक्टर प्रशांत भालेराव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते पुढे म्हणाले रेणुकामाता मल्टीस्टेट च्या महाराष्ट्रासह भारतात एकूण 103 शाखा असून दहा लाख सभासद आहेत .या अगोदर आम्ही आमची ए.टी.एम सुविधा ही फक्त आमच्या संस्थे पुरती मर्यादित होती. पण आता आमच्या मल्टीस्टेटच्या ए.टी.एम भारतातील कोणत्याही बँकांच्या ए.टी.एम मध्ये चालू शकते व आमच्या ए.टी.एम मशीन मध्ये कोणत्याही बँकेचे ए.टी.एम चालू शकते असे त्यांनी सांगितले आमची संस्था ऑनलाइन बँकिंग, क्यू .आर. पॉज मशीन, सर्व प्रकारचे लोन या सर्व प्रकारच्या सुविधा खातेदारांना देत आहोत .
आता ए.टी.एम सुविधेचा सर्व खातेदारांनी लाभ घ्यावा असे संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष डॉ प्रशांत भालेराव यांनी सांगितलेचौकटरेणुकामाता मल्टी स्टेटची ए.टी.एमची सुविधा सुरु केल्यामुळे ग्रामीण भागातील खातेदारांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे. सहजपणे कोणत्याही बँकेचे ए.टी.एम असले तर रेणुकामाता मल्टीस्टेटच्या ए.टी.एम.मधून पैसे काढता येतील.यामुळे ग्रामीण भागातील खातेदारांना व सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.अनिल वडागळे खातेदार
COMMENTS