राहुरी पोलीसांच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी पोलीसांच्या हद्दीत राज्य उत्पादन शुल्काची मोठी कारवाई

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी  राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात मोठ्या प्रमाणात असलेल्या  परराज्यांज्यातील मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग

कुंभारी विद्यालयात ‘इको फ्रेंडली गणेश मूर्ती’ कार्यशाळा उत्साहात
बाळासाहेबांची शिवसेनेच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी देवेंद्र लांबे
7 गावठी कट्टे…8 काडतुसे…3 तलवारींसह 14 जण ताब्यात; श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यांमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशन

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

राहुरी तालुक्यातील गुहा शिवारात मोठ्या प्रमाणात असलेल्या  परराज्यांज्यातील मद्य साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा मारला असुन ३ लाख ७५ हजार ११४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यास अटक देखील करण्यात आली आहे. 

बुधवारी दुपारी गुहा(ता.राहुरी) येथील कोळसे वस्ती शिवारात गोवा राज्य निर्मीती व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असणा-या विदेशी मद्याचा मोठा प्रमाणात असलेल्या  साठ्यावर छापा मारत हि कारवाई करण्यात आली आहे.त्यामधे एका वाहण देखील जप्त करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क श्रीरामपुर विभाच्या पथकाने हा छापा मारला असून  त्यामधे  ऋषिकेश भास्कर कोळसे, भाऊसाहेब गंगाधर कोळसे दोघे राहणार गुहा ता.राहुरी या आरोपीस रंगेहात पकडण्यात आले असुन अटक करण्यात आली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक बी.टी.घोरतळे,निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक एस.के.कोल्हे, पी.बी.आहीराव, एन.सी.परते, के.यू.छञे, एम.डी.कोंडे, ए.पी.बडदे, कुमारी ए.पी.तनपुरे, प्रवीण साळवे,दिपक बर्डे,वर्षा जाधव आदिंच्या पथकाने हि धाडसी कारवाई केली आहे. 

राहुरी तालुक्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. अनेक ठिकाणी परराज्यातील दारू तर काही ठिकाणी आणि बनावट दारूचे देखील सर्रासपणे विक्री केली जात आहे मात्र याबाबत राहुरी पोलीस कुठे ही कारवाई करताना दिसून येत नाही, त्यातच राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील दारूची सर्रास विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

COMMENTS