राशीन खून प्रकरणातील आरोपीला; कर्जत पोलिसांनी आठ तासात पकडले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राशीन खून प्रकरणातील आरोपीला; कर्जत पोलिसांनी आठ तासात पकडले

अहमदनगर/प्रतिनिधी- बायकोचा खून करून फरार झालेला आरोपी राहुल सुरेश भोसले (राहणार अजिंठानगर, पुणे) यास आठ तासात पकडण्याची कामगिरी कर्जत पोलिसांनी केली

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन
कोपरगावमध्ये अवैध वाळू उपसाप्रकरणी गुन्हा दाखल
सोनसाखळी चोर १ लाखांच्या मुद्देमालासह अटकेत; न्यायालयाने दिली ४ दिवसांची पोलीस कोठडी

अहमदनगर/प्रतिनिधी- बायकोचा खून करून फरार झालेला आरोपी राहुल सुरेश भोसले (राहणार अजिंठानगर, पुणे) यास आठ तासात पकडण्याची कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे. कर्जत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित, सुरेश माने, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलिस कॉन्स्टेबल तुळशीदास सातपुते, पांडुरंग भांडवलकर, संभाजी वाबळे, गणेश ठोंबरे, शाम जाधव, सागर म्हेत्रे, गणेश भागडे, संपत शिंदे, भाऊ काळे, सुनील खैरे आदींच्या पथकासह गावकर्‍यांच्या मदतीने आरोपी भोसले याला पकडण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आरोपी भोसले हा खून करून पळून गेला होता. पोलिस निरीक्षक यादव यांनी घटनास्थळ भेट देऊन आरोपी शोध मोहीम सहकार्‍यांच्या मदतीने सुरू केली होती. आरोपी माळवाडी परिसरातून काठड्यातून पलीकडे जाऊन दौडच्या दिशेने गेल्याबाबत माहिती मिळत होती. तीन पथके तयार करून करमाळा, दौंड आणि पुणे येथे रवाना करण्यात आली होती. ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल दिले होते. स्थानिक नागरिकांना मदतीला घेतले होते. तरीही आरोपी गुंगारा देत होता. शेवटी संध्याकाळी 6 वाजता कर्जत पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले. आरोपी हा रात्री पळून जाण्याच्या इराद्याने खूप मोठ्या काठड्यात लपून बसला होता. तेथून त्यास ताब्यात घेतले. आरोपी भोसले याने गुन्हा कबूल केला आहे. वारंवार सांगून व विनंती करूनसुद्धा पत्नी अपमानजनक वागणूक देत होती, नांदायला येत नव्हती. मुलांना संपर्क करू देत नव्हती. तिच्या नातेवाईकांनीही त्रास दिला होता, त्यांनी आरोपीला आणि आरोपीच्या आईला मारहाण केली होती, अशी माहिती भोसले याच्याकडून मिळाली.

COMMENTS