Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरेंच्या नावाने खंडणीची मागणी; फिल्म इंडस्ट्रीतील तिघांना बेड्या

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सध्य

….तर, मराठा आरक्षण आंदोलनाचे नैतिक बळच हरवेल!
बदलापूर घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक संपन्न 
स्वरुपखानवाडीच्या पाझर तलावाच्या भरावाला भेगा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नावावर खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सध्या व्हायरल झाला आहे. राज ठाकरे यांचे नाव घेत एका सुरक्षा रक्षकाला दमदाटी करताना व्हिडीओ आहे. या प्रकरणी आता तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
तू राज ठाकरेंना ओळखत नाहीस? काम कोणासाठी करतोयस? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतोयस ना तू? असे म्हणत, एका सुरक्षा रक्षकाला मारहाण करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने खंडणी मागितल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याच प्रकरणी सध्या मुंबईतील मालवणी पोलिसांकडून सिनेसृष्टीतील तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये दिग्दर्शक मिलन वर्मा, निर्माता युवराज बोराडे आणि चालक सागर सोलणकर यांना अटक करण्यात आली. तसेच पोलिसांनी याप्रकरणी एका मराठी अभिनेत्रीला देखील नोटीस पाठवली आहे. ही अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याची माहिती समोर येत असल्याने या प्रकाराला कोणते वळण येईल, हे सांगता येत नसल्याने पोलीस बुचकाळ्यात पडले आहेत.

COMMENTS