राज्य मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ?

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य मंत्रिमंडळात होणार खांदेपालट ?

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नसून, लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, या मंत्रिमंडळात अनेक फेरबदल बघायला मिळू शक

जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र स्थळांवर बचत गटांची उत्पादने 
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा
थाळ्या, टाळ्या पुरे, आता लस द्या ; राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर निशाणा

मुंबई/प्रतिनिधी : राज्यातील महाविकास आघाडीला कोणताही धोका नसून, लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, या मंत्रिमंडळात अनेक फेरबदल बघायला मिळू शकतात. या फेरबदलामध्ये काँगे्रसच्या दोन मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याचा अंदाज आहे. यात गृह राज्यमंत्री सतेज पाटील किंवा सहकार, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्‍वजीत कदम यांना बढती मिळू शकते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीच्या निमित्ताने एका विद्यमान मंत्र्याला अध्यक्षपदी विराजमान केले जाईल असेही बोलले जात आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद देखील रिक्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला असलेल्या पदावर कोणाची वर्णी लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होऊन काँगे्रसच्या एका राज्यमंत्र्यांना कॅबिनेट मंत्रीपद दिले जाऊ शकते. ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार डिसेंबर 2019 मध्ये झाला होता. त्यावेळी विस्तारामध्ये राष्ट्रवादीला 10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदे, शिवसेनेला 8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपद, तर काँग्रेसला 8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदे मिळाली होती. त्याआधी मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदे आहेत. याशिवाय विधानसभा अध्यक्षपद रिकामे असल्यामुळे या पदाची निवड देखील लवकरच होण्याची शक्यता आहे.

COMMENTS