महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती बेताची असून, त्यातून सावरण्यासाठी महामंडळाकडून अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची आर्थिक स्थिती बेताची असून, त्यातून सावरण्यासाठी महामंडळाकडून अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना आणि टाळेबंदीमुळे अनेक महिन्यापासून बंद असलेल्या एसटी सुरु झाल्या आहेत. त्यातच इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे महामंडळाने आपल्या ताफ्यात 100 इॅलेक्ट्रिक बस सुरु करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोलापुरातून दोन मार्गांवर इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्यात येणार आहेत.
यासाठी एसटी महामंडळाने नुकतेच टेंडर मागविले आहे. सोलापूर येथून सोलापूर-पुणे या अडीचशे किलोमीटर मार्गावर 10 बसेस आणि सोलापूर-विजापूर- सोलापूर या मार्गावर पाच बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. या दोन्ही मार्गांसह राज्यातील अन्य 17 विभागांतून इलेक्ट्रिक बस सोडण्यात येणार आहेत. औरंगाबाद-पुणे, पुणे-नाशिक, कोल्हापूर-पुणे, सोलापूर-पुणे, पुणे-महाबळेश्वर, पुणे-सातारा, कोल्हापूर-बेळगाव, सोलापूर-विजापूर, औरंगाबाद-नांदेड, औरंगाबाद-शिर्डी, नागपूर-भंडारा, नाशिक-शिर्डी या मार्गांवर 100 इलेक्ट्रिक बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी टेंडर मागविण्यात आलेले आहे.
COMMENTS