राज्यात ऑगस्टमध्ये लसीकरणात 30 टक्के घट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात ऑगस्टमध्ये लसीकरणात 30 टक्के घट

मुंबई : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत असले तरी, देखील त्या अपुर्‍या ठरतांना दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मि

मध्यप्रदेशमध्ये 2 मालगाड्यांची समोरासमोर धडक
ललित मोदी आणि सुष्मिता सेन लवकरच अडकणार लग्नबंधनात ?
नामांकित हॉटेलमध्ये बसून दिली क्लास वन अधिकाऱ्याची परीक्षा

मुंबई : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून रोखण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करत असले तरी, देखील त्या अपुर्‍या ठरतांना दिसून येत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवणे महत्वाचे आहे. मात्र अपुर्‍या लसीमुळे हा लसीकरणाचा वेग खालावत असल्याचे दिसून येत आहे. ऑगस्टमध्ये लसीकरणाच्या वेगात 30 टक्के घट झाल्यामुळे, कोरोनाची तिसरी लाट रोखणार कशी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
राज्य सरकारने लोकल प्रवासासाठी लसीकरण झालेल्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी करत आहेत. लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी कर्मचारी रात्रभर रांगा लावून लस घेण्यासाठी धडपड करत असताना एकीकडे लस तुटवड्यामुळं लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टपर्यंत लसीकरणात राज्यात 30 टक्के घट झाल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट कशी थोपवणार, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जुलैमध्ये लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, जुलैच्या तुलनेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र 30 टक्के घट दिसून आली आहे. लसीच्या तुटवड्यामुळं लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. राज्याला ऑगस्टमध्ये 8. 26 लाख डोस मिळाले होते. प्रामुख्याने मुंबईत लसीचा तुटवडा अधिक जाणवत आहे. गेल्या 15 दिवसांत मुंबईत तीन वेळा लसीकरण केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. त्यातच मुंबईकरांचा लोकल प्रवास पूर्णपणे लसीकरणाकरणावर अवलंबून असताना लसीकरण बंद असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार लसीचा पुरवठा करत नसल्याची राज्याची तक्रार आहे. त्यामुळे यातून लसीकरणाचा वेग वाढविण्यास सरकार यशस्वी ठरते का, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

राज्यातील लसीकरण कधी होणार पूर्ण ?
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असल्यामुळे यावर मात करण्यासाठी संपूर्ण राज्याचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे. जर राज्यसरकारने डिसेंबरअखेर संपूर्ण राज्याचे लसीकरण केल्यास, तिसर्‍या लाटेचा प्रभाव फारसा जाणवणार नाही. मात्र लसीकरणाचा वेग मंद असल्यामुळे लसीकरण वर्षअखेर पूर्ण होण्याची अपेक्षा बाळगता येणार नाही. मुंबईपालिकेने नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र अपुरा लससाठा, लशी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने करावी लागणारी आर्जवे, लसीकरणासंदर्भातील बदलते नियम आणि निर्बंध उठवल्यानंतर वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेता, हे ध्येय कसे गाठणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

लसपुरवठाअभावी लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागत आहे – नवाब मलिक
जेवढा लसीचा पुरवठा आवश्यक आहे तेवढा पुरवठा केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला होत नसल्याने लसीकरणाची केंद्र बंद करावी लागत आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. लसीचा दुसरा डोस घेणार्‍या लोकांची 20 लाख संख्या असून पहिला डोस घेणार्‍या लोकांची संख्या मोठी आहे. दुसर्‍या डोसची लस मिळेल परंतु पहिला डोस घेणार्‍यांना वाट पहावी लागत आहे. त्यामुळेच लसीकरण केंद्रे बंद पडत आहेत, असं मलिक यांनी नमूद केले. ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये लसीचा साठा आहे. तो संपत नसल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

COMMENTS