प्रतिनिधी : मुंबई “राज्याच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी मोठे योगदान दिले. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते. यात मृ
प्रतिनिधी : मुंबई
“राज्याच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी मोठे योगदान दिले. त्या अनेकांपैकी काहींची आठवण ही प्रकर्षाने आपल्या सगळ्यांना होते. यात मृणालताईंचे नाव आल्याशिवाय राहणार नाही, असे नाही.
अनेकदा मृणालताई गोरे सदनात असताना वाद व्हायचे. पण ते राज्याच्या हिताचे असायचे. सुसंवाद पाहायला मिळायचा. मात्र, तो सुसंवाद आता पाहायला मिळत नाही. परंतु, आतातर कोथळा काढायची भाषा केली जाते.” असे वक्तव्य शरद पवारांनी केले.
सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर विचारवंतांकडून चिंता व्यक्त होत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आताच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले आहे.
पवारांच्या हस्ते आज शनिवारी मृणालताई गोरे दालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी मृणालताई गोरे यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या.
केशव गोरे स्मारक ट्रस्टच्यावीतने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई व अध्यक्षस्थानी बाबा आढाव यांची उपस्थिती होती. “मृणालताई गोरे दालन, संघर्षाचा कलात्मक अविष्कार” असे या पत्रिकेवर नमूद होते.
दरम्यान, या कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई यावेळी उपस्थित असताना त्यांनीही उपस्थितांना संबोधले. ते म्हणाले, “आज मृणालताईंचे एक दालन सुरू होत आहे. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.
मृणालताई गोरे कोण होत्या, त्यांचे काय कार्य होते, हे या दालनात बघायला मिळेल. आकाशात कडाडणाऱ्या वीजेला हातात पकडण्यासारखे ते आहे. मृणालताईंच्या कामाचा प्रभाव त्या काळातील सर्व विचारसरणीच्या कार्यकर्त्यांवर पडत होते.
म्हणून कळत न कळत कार्यकर्त्यांची एक पिढी नक्कीच मृणालताईंच्या सावलीत वाढली, असे म्हणायला हरकत नाही. त्यांनी निवारा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, निराधार महिलांचे प्रश्न हाती घेतले.
केवळ रस्त्यावर उतरून चळवळ करणे एवढ्यापुरते त्यांचे कार्य मर्यादित नव्हते तर रचनात्मक कार्य उभारायचे, हे देखील त्या करायच्या.”
COMMENTS