राज्यात आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आढळले डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण

रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये एसआरएस-कोवि-2 डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत.

दहशतवाद्यांनी शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या I LOKNews24
पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
तुमचे आजचे राशीचक्र शनिवार, ११ जून २०२२ | LOKNews24

मुंबई/ प्रतिनिधीः रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये एसआरएस-कोवि-2 डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, किती ठिकाणी हा विषाणू पसरला आहे, हे समजून घेण्यासाठी आणखी नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. याआधी महाराष्ट्रात डेल्टा-प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले होते.

 भारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.1.617.2 या कोरोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे. मोनोक्लोनल अ‍ॅन्टीबॉडी कॉकटेल उपचार पद्धती या विषाणूचा प्रतिकार करते, की नाही समजून घेण्यासाठी संशोधन चालू आहे. एक किंवा दोन महिन्यात महाराष्ट्रात ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे. आम्हाला नवी मुंबई, पालघर आणि रत्नागिरीमध्ये डेल्टा-प्लस सापडला. त्यानंतर, आम्ही आणखी नमुने पाठविले; पण अंतिम अहवाल अपेक्षित आहे, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) चे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. पश्‍चिम महाराष्ट्रात, विशेषत: कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, सातारा आणि सांगलीमध्ये रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. डेल्टा प्लसचे सात पैकी पाच रुग्ण हे रत्नागिरी जिल्ह्यात आढळून आले आहेत. दहा जून रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 13.7 टक्के होता. त्या वेळी राज्याचा दर हा 5.8 होता. रत्नागिरीमध्ये कोरोनाचे सहा हजार 553 सक्रिय रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळणार्‍या जिल्ह्यांमध्ये येतो.

COMMENTS