राज्यातील साखर कामगारांना  12 टक्के वेतनवाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के वेतनवाढ

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी राज्यातील साखर कामगारांना 1 एप्रिल 2019 पासून 12 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णयावर त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत शिक्क

एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमांसाठी सीईटी नाही : वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख
जोपर्यंत बाई जीव देत नाही तोपर्यंत तिच्या म्हणण्याला राज्यात किंमत नाही-चित्रा वाघ I l LOK News 24
नागरिकांना राहण्यायोग्य सर्वोत्तम असे महानगर विकसित करा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी

राज्यातील साखर कामगारांना 1 एप्रिल 2019 पासून 12 टक्के वेतनवाढ देण्याचा निर्णयावर त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत शिक्का मोर्तब करण्यात आले आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे दीड लाख साखर कामगारांना लाभ होणार आहे.

राज्यातील साखर कामगारांच्या वेतन कराराची  मुदत 31 मार्च 2019 रोजी संपली होती. त्रिपक्षीय समिती तातडीने गठीत करून नवीन वेतनवाढ मिळावी यासाठी राज्यातील साखर कामगार संघटनांनी  राज्य शासन  व शरद पवार यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. शरद पवार यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, उर्जा व कामगार विभागाने  दि. 12 नोव्हेबर 2020 रोजीच्या शासन निर्णयाने साखर कामगारांच्या वेतन वाढीवर निर्णय घेणेसाठी त्रिपक्षीय समीती स्थापन केलेली आहे.

            या समितीच्या आजपर्यंत दि.16 डिसेंबर 2020, दि.12 जानेवारी 2021, दि.11 फेब्रुवारी 2021 व दि. 26 फेब्रुवारी 2021 अशा बैठका झाल्या. परंतु या बैठकांमध्ये साखर कारखाना प्रतिनिधी 5 ते 8 टक्के वेतनवाढ, तर साखर कामगार संघटना 20 टक्के वेतनवाढ मिळण्यासाठी ठाम होत्या. तोडगा न निघाल्याने माजी कृषीमंत्री शरद पवार  यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार शरद पवार यांनी साखर कारखानदार व साखर कामगार प्रतिनिधीशी चर्चा करून 12 टक्केपर्यत वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुरुवार दि.9 सप्टेंबर रोजी पुणे  येथील साखर संकुलात  राज्य साखर कारखाना संघ तथा त्रिपक्ष समितीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर  यांचे अध्यक्षतेखाली त्रिपक्षीय समितीची बैठक संपन्न झाली. त्यात 12 टक्के वेतनवाढ देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 1 एप्रिल 2019 पासून ही वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे.

              या बैठकीला राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, सदस्य सचिव कल्याण आयुक्त रविराज इळवे, साखर कारखाना संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कादवा कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, प्रकाश आवाडे, राजेंद्र नागवडे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, साखर कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशन(इंटक)चे अध्यक्ष अविनाश आदिक, सरचिटणीस नितीन पवार, साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष अविनाश आपटे, साखर कामगार महासंघाचे सरचिटणीस कॉ.सुभाष काकुस्ते, चिटणीस कॉ.आनंद वायकर, अशोक बिरासदार, राऊसाहेब पाटील, शंकरराव भोसले, सुरेश मोहिते, डी. डी वाकचौरे, योगेश हंबीर आदी उपस्थित होते.

        शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या वेतनवाढ निर्णयाचे महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे खजिनदार डी.एम.निमसे, संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, अशोक पवार, संभाजी माळवदे यांनी स्वागत केले

COMMENTS