राज्यातील निर्बंध अधिक कडक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यातील निर्बंध अधिक कडक

राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील केले होते; मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली.

सीएनजी अडीच रुपयांनी महागला
यवतमाळ ‘ती’ बस नाल्यातून बाहेर, चालकासह चौघांचा मृत्यू
दुर्दैवी! वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या | LOKNews24

मुंबई/ प्रतिनिधीः राज्यामध्ये कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथील केले होते; मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसांतच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोकादेखील वाढू लागला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसर्‍या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.

    आता सर्व जिल्हे तिसर्‍या टप्प्याच्या वरच असणार आहेत. काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. टप्पा कमी करायचा असेल तर दोन आठवड्याचा ट्रेंड चेक करावा लागणार असल्याची माहिती आहे. डेल्टा प्लसचे राज्यात 21 रुग्ण असून त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे; मात्र या व्हेरियंटमुळे कुठलेही निर्बंध लावले जाणार नसल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, तिसर्‍या लाटेसंदर्भात शासन स्तरावर सर्व तयारी झाली असून राज्याचा आरोग्य विभाग यासाठी सज्ज असल्याचेदेखील टोपे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले, की दुसर्‍या लाटेचे शेपूट अजून बाकी आहे. आपण पूर्णपणे त्यातून बाहेर आलेलो नाही. जिल्ह्यांसाठी विविध निर्बंधांच्या पातळ्या ठरविल्या असल्या, तरी स्थानिक प्रशासनाने प्रत्यक्ष परिस्थिती पाहून आणि कुठलाही धोका न पत्करता निर्बंधांबाबत निर्णय घ्यायचा आहे. लेव्हल्सचा आधार घेऊन नागरिक मुक्तपणे आरोग्याचे नियम न पाळता सर्व व्यवहार करणार असतील आणि गर्दी करणार असतील तर संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढून परिस्थिती बिघडू शकते. यादृष्टीने आपल्या शहर अथवा जिल्ह्यातील संसर्गाचा नीट अभ्यास करा आणि घाईघाईने व्यवहार खुले करू नका, असे आवाहन त्यांनी केले.

विशेष कृती

* लोकजागृतीच्या उपक्रमांद्वारे लसीकरणाचा वेग वाढवणे; पात्र लोकांपैकी किमान 70 टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे.

* कोव्हिडचा प्रसार रोखण्यासाठी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब करावा.

* कोव्हिडच्या विषाणूचा हवेतून प्रसाराचा गुणधर्म लक्षात घेता हेपा फिल्टर्स किंवा एक्झॉस्ट फॅनचा वापर करून वातानुकूलनाच्या उचित नियमांचे पालन करीत कामकाजाच्या ठिकाणांची व कार्यालयांची सुरक्षितता निश्‍चित करणे संबंधितांना बंधनकारक करावे.

* आरटी-पीसीआर चाचण्या तसेच इतर चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्यात.

कोव्हिडरोधक वर्तणूक न करणार्‍यांवर प्रभावीपणे दंडात्मक कारवाई करावी.

गर्दी, जमाव आणि मेळाव्यांना प्रोत्साहन मिळेल असे सोहळे/कार्यक्रम/उपक्रम टाळावेत.

* न्याय्य पद्धतीने कन्टेनमेन्ट क्षेत्रे घोषित करावीत. बाधित क्षेत्रावरच बंधने लागू करावीत.

* विवाह सोहळे आणि उपाहारगृह, मॉल यांसारख्या गर्दीची अधिक शक्यता असलेल्या ठिकाणांची तपासणी करावी.

COMMENTS