राजस्थान भाजपतील वाद चव्हाट्यावर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजस्थान भाजपतील वाद चव्हाट्यावर

राजस्थानात काँग्रेसमध्ये कलह सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासाठी त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत.

उपचारानंतर कॅन्सरग्रस्त रुग्णही चांगले आयुष्य जगू शकतो : डॉ. सुरेश भोसले
लातूर जिल्ह्यात पाच महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू | DAINIK LOKMNTHAN
संसदेतील गतिरोध संपवा ! 

जयपूर: राजस्थानात काँग्रेसमध्ये कलह सुरू असतानाच भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासाठी त्यांचे समर्थक मैदानात उतरले आहेत. ‘वसुंधरा लाओ’ ही मोहीम हाती घेतानाच ‘वसुंधरा म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच वसुंधरा’ असा नाराही वसुंधरा राजे समर्थकांनी लगावला आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजपचे माजी आमदार प्रल्हाद गुंजल, माजी मंत्री भवानी सिंह राजावत यांनी पत्रकार परिषद घेतली. देशात ज्या पद्धतीने भाजपसाठी मोदी यांचे स्थान आहे. त्याचप्रमाणे राजस्थानात भाजपमध्ये वसुंधरा राजे यांचे स्थान आहे. राजस्थानात वसुंधरा राजे यांच्याशिवाय कोणताही चेहरा चालणार नाही. संपूर्ण पक्ष वसुंधरा राजे यांच्यामुळेच सत्तेत आला आहे. वसुंधरा राजे नसत्या तर भाजप सत्तेत आला नसता, असा दावा राजावत यांनी केला. तसेच राज्यातील प्रदेशाध्यक्षांकडेही तेवढी कुवत नसल्याचे ते म्हणाले. राजावत यांची पत्रकार परिषद होत नाही तोच माजी मंत्री प्रतापसिंह सिंघवी आणि माजी मंत्री रोहिताश शर्मा यांनीही मैदानात उडी घेतली. राजस्थानात मुख्यमंत्रिपदाचे 15 दावेदार भाजपमध्ये फिरत आहेत. त्यांना कोणीही विचारत नाही. भाजपला सत्तेत यायचे असेल तर वसुंधरा राजे यांच्याशिवाय पर्याय नाही. नाही तर राज्यातून पक्ष संपुष्टात येईल, असा इशारा त्यांनी दिला. वसुंधरा राजे यांच्यासाठी एक डझन माजी खासदार आणि माजी आमदार मैदानात उतरले आहेत. दरम्यान, अचानक वसुंधरा राजे समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याने भाजपचे प्रदेश नेतृत्वही हैराण झाले आहे. भाजपमध्ये हा अवकाळी पाऊस का सुरू झाला तेच कळत नाही. अजून निवडणुकीला अडीच वर्षे बाकी आहे. आमच्या पक्षाचे काही नेते काँग्रेससोबत हातमिळवणी करून षडयंत्र रचत आहेत. भाजपमधील कलह चव्हाट्यावर आणून काँग्रेसमधील वादावर पांघरून घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे. कारण मुख्यमंत्रिपदासाठी संघर्ष करण्याची ही वेळच नाही, असे सांगतानाच भाजप हा व्यक्तिनिष्ठ पक्ष नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कोणीही पक्षापेक्षा मोठा नाही, असे गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले.

वसुंधरा राजे यांचे मौन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनियाही या वादाने हैराण झाले आहेत. नेत्यांकडून शिस्त भंग केला जात आहे. त्याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री कोण असावा हे भाजपचे संसदीय मंडळ  ठरवते. घरात बसलेले नेते ठरवत नाही. हा कार्यकर्त्यांना पक्ष आहे. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा आहे, असे पुनिया यांनी सांगितले. या सर्व प्रकारावर वसुंधरा राजे यांनी मौन साधल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

COMMENTS