Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रहात्यातील कातनाल्यावर उभारणार अप्परग्राऊंड बाजारतळ; जापनीज टेक्नॉलॉजीचा होणार वापर ; माजी खा. सुजय विखे

राहाता : शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी

साईमंदिरात फुल-हार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील ः डॉ. सुजय विखे
जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : डॉ. सुजय विखे
आमच्या सांघिक कामामुळे विरोधकांना माणसे गोळा करणे जड जात आहे ;- डॉ.सुजय विखे

राहाता : शहरात जपानी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आधुनिक ‘अप्पर वॉटर’ बाजारतळ उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार होत आहे. सुमारे 7 कोटी रुपये खर्चून आणि हायटेक बाजारतळ उभारला जाणार असून, असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

राहात्यातील आठवडे बाजारचा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत होता. हा बाजार वीरभद्र मंदीरासमोरील मैदानात भरत असल्याने, पसिररातील शाँपिंग काँम्प्लेक्समधील व्यापाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. शिवाय हे मैदान बाजारसाठी कमी पडत असल्याने शेतकरी व व्यापारी नगर-मनमाड महामार्ग व साकुरी रस्त्याच्या कडेला बसत होते. त्यामुळे अनेकदा वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत होती. हिच समस्या सोडविण्यासाठी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाँ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेतलाय. यावेळी कातनाल्याची स्वच्छता व इस्टीमेंट तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कातनाल्यावर झालेल्या अतिक्रमणधारकांना नोटीसा देऊन कातनाला मोकळा करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी माजी खा.सुजय विखे पाटील यांनी नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह स्वतः कातनाल्यात उतरत पाहणी केली. कातनाला अंडरग्राऊंड केल्यास त्यावर बाजारतळ विकसित करता येईल, असा मानस त्यांनी बोलून दाखवला.

 येत्या 1 एप्रिलपासून या कामाला प्रारंभ करण्यात येईल व पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, असा मानसही विखे यांनी व्यक्त केला. यावेळी राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर व इतर नगरसेवक तसेच नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील पहिला प्रयोग

जापनीज टेक्नॉलॉजीतून उभारण्यात येणारा हा हायटेक बाजारतळाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग असणार आहे. त्यासाठी तब्बल सात कोटी रुपये खर्च येणार आहे. याबाबत माहिती देताना सुजय विखे पाटील म्हणाले की, राहाता शहराचा बाजार वर्षानुवर्षे विरभद्र मंदीरासमोर भरतो. परंतु या बाजारामुळे मंदीरातील भावीक व परिसरातील व्यावसायिकांना अडचण होते. शिवाय साकुरी व नगर-मनमाड रस्त्यावरील वाहनांनाही अडथळा येतो. जर कातनाला अंडरग्राऊंड केला, तर सुमारे एक ते दीड एकर जागा वापरायला मिळते. या कातनाल्याच्या पुराचे भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करुन आराखडा तयार केला जाणार आहे

COMMENTS