प्रतिनिधी : बुलडाणाबुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी होती . आणि रस्त्यातच काही जण न
प्रतिनिधी : बुलडाणा
बुलढाण्यातील देऊळगाव राजा मार्गावरील सरंबा फाट्यावर काहीजण पोलिसांची पाटी लावलेली कार रस्त्यावर उभी होती . आणि रस्त्यातच काही जण नाचत होते. यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली होती.
यादरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राणा चंदन यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात भेटून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड परत येत होते. यावेळी देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्याजवळ महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती.
यादरम्यान पुढे जाऊन पाहिले असता रस्त्याच्या मधोमध ‘पोलीस’ अशी पार्टी करत होते. MH28 AN 3641 क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या कारसमोर काही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत नाचत होते.
संजय गायकवाड यांनी हा प्रकार पाहिला. गायकवाड यांनी पोलिसांना चांगलेच खडेबोल सुनावले . एवढच नव्हे तर गायकवाड यांनी एका पोलिसाच्या कानाशिलात देखील लगावली.
त्यानंतर पोलिसांनी तिथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार देऊळगाव महीजवळ असलेल्या सरंबा फाट्यावर रविवारी सायंकाळी घडला या घटनेवर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
घडलेला प्रकार हा पोलीस खात्याला अशोभनीय असल्याचं म्हणत जे अधिकारी यात दोषी आहेत त्यांचा डिफॉल्ट रिपोर्ट मागविला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे मद्यधुंद अवस्थेत महामार्गावर नाचणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाच्या कानशिलात लगावली माहिती समोर येत आहे . तसेच यासंदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
COMMENTS