युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची नियुक्ती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवा सेनेच्या राज्य सहसचिवपदी विक्रम अनिलभैय्या राठोड यांची नियुक्ती

नगर -  शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी राज्यभरात चांगले काम करत आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्यावतीने सर्वसामान्य

विविध मान्यवरांचा गोल्डन ग्रुपच्या वतीने राहुरीत सत्कार
 बाबासाहेब कवाद निघोज पतसंस्था सभासदांना देणार १२ टक्के लाभांश- श्री वसंत कवाद
बहिणींच्या राखीने बंदिवान भाऊ गहिवरले

नगर – 

शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी राज्यभरात चांगले काम करत आहे. पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारच्यावतीने सर्वसामान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे काम युवा सेनेचे पदाधिकारी करत आहे. समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी युवासेना घेत असलेला पुढाकाराची दखल घेत नवीन पदाधिकार्‍यांच्या नियुक्ती करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम युवा सेनेचे प्रमुख ना.अदित्य ठाकरे करत आहेत. नगर जिल्ह्यातही युवासेनेने ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविले आहेत. आता पक्षाच्यावतीने आपणावर सहसचिवपदीची जबाबदारी सोपवली आहे, त्या माध्यमातून जिल्ह्यासह राज्यात युवा सेनेचे कार्य वाढविण्यात येईल. जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम सर्वांना बरोबर घेऊन करु. त्यासाठी गाव तेथे शाखा व घर तेथे शिवसैनिक अभियान राबविणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे नूतन राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केले.

     युवा सेना जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांची राज्याच्या सहसचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा युवा सेनेच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अविनाश कोतकर, शहरप्रमुख हर्षवर्धन कोतकर, मृणाल भिंगारदिवे, पप्पू भाले, प्रा.अंबादास शिंदे, शाम सोनवणे, महेश शेळके, अंकुश चोपडा, अविनाश ढगे, वैभव ढगे, सुजित मांडेकर, वैभव ताकपेरे, पप्पू आंबेकर, हर्षल सोनवणे, अनिल पानसरे, भाऊ वाघमारे, बंट्टी मांडेकर, निखिल कांडेकर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख अविनाश कोतकर म्हणाले, नगर जिल्ह्यात युवा सेनेने चांगल्या कामाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यामुळे युवासेनेत अनेक युवक दाखल होत आहेत. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांची राज्याच्या सहसचिवपदी निवड झाली ही जिल्ह्यातील युवासेनेच्यादृष्टीने अभिमानास्पद बाब आहे. या पदाच्या माध्यमातून ते युवकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतील, असे सांगितले.

     यावेळी हर्षवर्धन कोतकर म्हणाले, युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन उभे केले आहे. युवकांना एकत्र करुन समाजातील प्रश्न, शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळेच त्यांची राज्याच्या कार्यकारिणीत निवड झाली आहे. यापुढेही ते चांगल्या कामांनी आपला वेगळा ठसा राज्यात उमटवितील, असा विश्वास व्यक्त केला.

COMMENTS