संगमनेर (प्रतिनिधी) भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण हेच भारताचे बलस्थान आहे. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात बेरोजगारी , महागाई व विविध प
संगमनेर (प्रतिनिधी)
भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण हेच भारताचे बलस्थान आहे. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात बेरोजगारी , महागाई व विविध प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे तरुण मात्र सोशल मीडियात व्यस्त आहेत .त्यामुळे त्यांना बेरोजगारीची अजिबात ही जाण होत नाही .म्हणून टीका टिपणी करण्यापेक्षा तरुणांनी सोशल मीडिया मधून बाहेर पडत समाजासाठी सक्रिय काम करावे असे आवाहन अमेरिकेतील तरूण मेयर जस्टिन मुसेल्ला यांनी केले आहे.
जयहिंद लोक चळवळीच्या वतीने आयोजित दुसऱ्या ऑनलाईन ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये प्रगत जगासाठी तरुणांचे योगदान या विषयावर ते बोलत होते. या संवादात अमेरिकेच्या डॉ. सदफ जाफर ,अमेरिकेतून आयटी तज्ञ सचिन इटकर, आसामच्या अर्पिता दत्ता ,इंग्लंडमधून अथिरा पिल्लाई ,संकेत मुनोत यांसह महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे आदींनी सहभाग घेतला .यावेळी अमृतवाहिनीतील द्रोणागिरी च्या व्यासपीठावर नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे ,सौ गितांजलीताई शेळके, सत्यजित तांबे, उत्कर्षाताई रूपवते उपस्थित होते. तर ऑनलाईन पद्धतीने नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना जस्टिन मुसेल्ला म्हणाले की ,जगामध्ये सध्या अशांतता आहे. मनभेद निर्माण केला जात आहे. मात्र तरुणांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा आदर्श विचार बाळगत देशांमध्ये एकात्मता व शांती वाढवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. प्रेम व बंधुभावाने एकमेकास सहाय्य करत जगाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तरुणांवर आहे. मात्र सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक तरुण फक्त सोशल मीडिया टीका टिप्पणी करत असतात .या विनाकारणच्या व्यस्ततेमुळे त्यांच्या जीवनातील खरे काम दुर्लक्षित होऊन जाते .बेरोजगारी, समाजातील समस्या, अंधश्रद्धा ,शिक्षणापासून वंचित समाज, अस्वच्छता या समस्यांकडे ते सोयीस्कर दुर्लक्ष करतात .म्हणून तरुणांनी सोशल मीडियातून बाहेर पडत समाजासाठी काम केले तर बलशाली राज्य, बलशाली राष्ट्र आणि बलशाली जग निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
तर सत्यजित तांबे म्हणाले की, भारतामध्ये तरुणांची मोठी संख्या आहे .मात्र तरुण सध्या भरकटला जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदर्श विचारांवर तरुणांनी देशाच्या एकात्मतेसाठी काम केले पाहिजे. वाढती महागाई ,बेरोजगारी अत्यंत धोकादायक आहे .मात्र जातीयवाद निर्माण करून तरुणांना सोशल मीडिया मध्ये गुंतवले जात आहे .तरुणांनी यातून बाहेर पडत सत्यता जाणून घेतली पाहिजे. कोरोणा संकटामुळे जग बदलले आहे. या संकटाने खूप काही शिकवले आहे. भारतामध्ये आरोग्यव्यवस्था आणखी समृद्ध करत युवकांनी विशेषता आपल्या परिसरामध्ये निरोगी समाजनिर्मितीसाठी अधिक योगदान द्यावे. जयहिंद लोकचळवळ पंचवीस वर्षांपूर्वी लावलेले रोपटे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले असून जगभरातील अनेक विविध क्षेत्रातील तरुण यामध्ये सहभागी झाले आहेत हा जयहिंद साठी अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले
तर न्यू जर्सीच्या माजी मेअर डॉ सदफ जफर म्हणाल्या की, राजकारणात काम करताना छोट्या वयातच मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे. स्थानिक पातळीवर युवकांनी काम करावे. जागतिक व देश पातळीवर च्या चर्चा न करता आपण स्थानिक विभागात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घ्यावा असे च्या म्हणाल्या तर सचिन इटकर, अर्पिता दत्ता, अथिरा पिल्लाई, संकेत मुनोत यांनीही यावेळी तरुणांच्या योगदानाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले .
याप्रसंगी खालीद पठाण, प्रा गणेश गुंजाळ, बंटी साळवे, समीर लामखेडे, चांगदेव खेमनर, नामदेव कहांडळ, मिलिंद औटी, तुषार गायकर, निखील पापडेजा, गौरव डोंगरे, शेखर सोसे, हैदर अली सय्यद, टेक्निकल विभागाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. मनोज चौधरी, समीर कडलग, राहुल गुंजाळ, योगेश दिवाने, महेश दिघे ,राहुल गायकवाड ,ऋतिक पावशे, सुजित पानसरे आदी उपस्थित होते..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमेरिकेहून डॉ. सुरज गवांदे यांनी केले तर सूत्रसंचालन समन्वयक उत्कर्ष ताई रूपवते व सौ गितांजली ताई शेळके यांनी केले तर डॉ वैष्णवी केदार यांनी आभार मानले..
COMMENTS