युवकांनी ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानून कार्य करावे – डॉ. आर. जे. बार्नबस

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवकांनी ए.पी. जे. अब्दुल कलाम यांना आदर्श मानून कार्य करावे – डॉ. आर. जे. बार्नबस

नगर - अहमदनगर महाविद्यालयांमधील विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात आला. संपूर्ण भारतात ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म

अहमदनगर मध्ये एसटी चालकाची गळफास घेऊनआत्महत्या (Video)
नेप्ती परिसरात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे कामे होणार -गाडे
पहाटे पहाटे मला जाग आली…; काँग्रेस शहराध्यक्षांच्या गझलेला रसिकांची टाळ्यांची दाद

नगर –

अहमदनगर महाविद्यालयांमधील विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने वाचन प्रेरणादिन साजरा करण्यात आला. संपूर्ण भारतात ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून भारत भर साजरा केला जातो . भारताची खरी शक्ती म्हणजे युवाशक्ती, शाळा, महाविद्यालय यातील विद्यार्थी आहेत  त्यांनी डॉ कलाम यांचे पुस्तके तसेच इतर पुस्तके वाचावी आणि आपली मने प्रज्वलित करावी,  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.  

या कार्यक्रमांतर्गत अहमदनगर कॉलेजमध्ये   अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य आर.जे बार्नबस “म्हणाले की दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास, कणखर मन आणि दिलदार स्वभाव इत्यादी विविध गुणांमुळे डॉ कलाम यांनी देशातील  युवा पिढीला आपल्या विचारांनी भारावून टाकले.  भारत नक्कीच भविष्यात  महासत्ता बनेल असा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला. त्यांचे लिखाण स्फूर्तिदायी आहे. म्हणून आज प्रत्येक युवक त्यांच्या विचारांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतो. 

त्यांनी वैज्ञानिक क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा ठसा उमटूनविविध  शोध लावले .एक वैज्ञानिक म्हणून काम करत असताना त्यांनी विविध स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली म्हणून त्यांना मिसाईल म्यान  असेही संबोधले जाते.अद्मीने  सुरज की तरह चमकने के लिये सुरज की तरह जालना जरुरी है असे ते म्हणत .तसेच त्यांनी माणसातला माणूस शोधण्याचे काम केले म्हणून ते खऱ्या अर्थाने मानवतेचे पुजारी आहेत.  त्यांचे प्रेरणादायी विचार त्यांनी शब्दातून मांडले असे नाही तर कृतीतून उतरविले. त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि  भारतरत्न या उपाधीने सन्मानित करण्यात आले. आजच्या युवकांनी त्यांना आदर्श मानून कार्य करावे असे विचार त्यांनी मांडले.

      या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे रजिस्टार दीपक अल्हाट, उपप्राचार्य अरविंद नागवडे, उपप्राचार्य बी. एम. गायकरआणि कॉलेजच्या विविध विभागाचे   विभाग प्रमुख , प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

      या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उन्नत भारत अभियान चे प्रमुख प्राध्यापक विलास नाबदे यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ भागवत परकाळ यांनी मानले.

COMMENTS