प्रतिनिधी : पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी युती करण्य
प्रतिनिधी : पुणे
महानगरपालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी युती करण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. आम्हाला कुणीही परके नाही. कुणाशीही हातमिळवणी करून येणाऱ्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड ताकतीने निवडणुका लढवणार आहे. गेल्या ३० वर्षांचा संभाजी ब्रिगेडच्या सामाजिक कामाचा आढावा महाराष्ट्रासमोर आहेच. संभाजी ब्रिगेड राजकीय पार्टी म्हणून नोंदणी झालेली असून राजकीय सत्तेसाठी एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि जर कोणत्याही पक्षा सोबत हातमिळवणी झाली नाही, तरीही संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य निवडणूका स्वबळावर लढवणार आहे. संभाजी ब्रिगेड स्थानिक स्वराज्य निवडणूकीत ‘पडू,पाडू किंवा निवडून येऊ’ हाच एक मुखी निर्णय राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आला.
*”संभाजी ब्रिगेड राज्य कार्यकारिणी बैठक…” शनिवार दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी स्थळ – मातृतिर्थ सिंदखेड राजा, जि. बुलढाणा येथे संपन्न झाली.* या बैठकीला राज्यातील सर्व राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य, सर्व महानगराध्यक्ष,जिल्हाध्यक्ष, विभागीय अध्यक्ष या सर्वांची एकत्रित बैठक झालेली आहे.शंभर टक्के समाजकारण करण्यासाठी शंभर टक्के राजकारणाची गरज आहे आणि आज आगामी होऊ घातलेल्या निवडणूकांचा योग्य टायमिंग असल्याने संभाजी ब्रिगेड कुणाशीही हातमिळवणी करण्यासाठी तयार असून सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये एकमुखी पाठिंबा दिलेला आहे.कार्यकर्ते सत्तेमध्ये सहभागी झाले पाहिजे हीच संभाजी ब्रिगेड ची अपेक्षा आहे.राजसत्ते शिवाय पर्याय नाही हे एकमेव सूत्र लक्षात घेऊन संभाजी ब्रिगेड ने प्रत्येक स्थानिक पातळीवर आपली ताकद वाढवावी संघटन वाढवावे व सर्वांशी संवाद साधावा याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड. मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बैठक पार पडली. यामध्ये युती किंवा आघाडी चा निर्णय घेण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेड राजकीय मतभेद बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या हितासाठी योग्य वेळी योग्य तडजोड करून निवडणुका लढवणार आहे.मुंबई, पुणे व इतर महानगरपालिकेमध्ये व सर्व नगरपालीकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून सर्वसमावेशक ताकदीच्या जोरावर निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. महानगरपालिका,नगरपालीका व जिल्हा परिषद मध्ये संभाजी ब्रिगेडचा येनकेन प्रकारे प्रवेश झालाच पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संभाजी ब्रिगेड आता आपले खाते उघडणार यात शंका असणार नाही. म्हणून युती किंवा आघाडीचा निर्णय लवकरच चर्चेतून सुटेल, असा विश्वास संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ॲड मनोज आखरे यांनी व्यक्त केला.
मात्र तीर्थ सिंदखेड राजा येथील बैठकीस… संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मा.ॲड मनोजदादा आखरे, महासचीव मा.सौरभ खेडेकर, कोषाध्यक्ष संतोष गाजरे, कार्याध्यक्ष सूधीरमामा देशमूख, डॅा.गजानन पारधी, ऊपाध्यक्ष डॅा.प्रदीपकूमार तूपेरे, ऊपाध्यक्ष सूहाजजी राणे, ऊपाध्यक्ष, अण्णासाहेब सांवत, प्रवक्ते डॅा.प्रा.शिवानंद भानूसे, प्रेमकूमार बोकेसर, प्रदेष संघटन सचिव डॅा.संदीप कडलग, प्रदेश संघटक डॅा.सुदर्शन तारक,प्रदेश संघटक संतोष शिंदे, शशिकांत कन्हेरे,प्रदेश संघटक अतूल गायकवाड, तूषार ऊमाळे, इंजि.विजय पाटील, ऊमाकांत ऊफाडे,क्रेंदीय कार्यकारीणि सदस्य राहूल वाईकर,संकेत पाटील,अभिजीत दळवी इत्या.यांची प्रमूख ऊपस्थीती होती. सर्व सन्मा.विभागीय अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, महानगरअध्यक्ष, शहराध्यक्ष यांची उपस्थिती होती.
COMMENTS