“‘या” जिल्हा रुग्णालयासह नऊ  प्रयोगशाळांना नोटिसा परवाना निलंबित करण्याचा मनपाचा इशारा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“‘या” जिल्हा रुग्णालयासह नऊ प्रयोगशाळांना नोटिसा परवाना निलंबित करण्याचा मनपाचा इशारा

वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रासह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत.

कोकमठाणमध्ये ज्ञानेश्‍वरी पारायण, कीर्तन महोत्सव
आ.थोरात यांनी पठार भागात भेट देऊन साधला नागरिकांशी संवाद
शिवसेनेचा महापौर व राष्ट्रवादीचा उपमहापौर ; आ. संग्राम जगतापांचे अखेर स्पष्टीकरण

अहमदनगर/प्रतिनिधी-वेळोवेळी पाठपुरावा करूनही कोरोना चाचण्यांची माहिती सादर न केल्याने महापालिकेने जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रासह शहरातील नऊ प्रयोगशाळांना नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या वर्षभरातील महापालिकेची अशा स्वरूपातील पहिलीच कारवाई आहे. जिल्हा रुग्णालय, मोलेक्युलर, एजीडी, मेट्रो, सहयोग, हेल केअर, कृष्णा, सुयोग या प्रयोग शाळांना नोटिसा बजविण्यात आल्या असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कोरोनाची लक्षणे असणार्‍यांची महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रात चाचणी केली जाते तसेच जिल्हा रुग्णालयातील चाचणी केंद्रात स्वॅब घेतले जात असून याशिवाय आठ खासगी प्रयोगशाळांमध्ये तपासणी केली जाते. यापैकी महापालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये किती व्यक्तींचे स्वॅब घेतले, याची माहिती प्रशासनाला नियमित मिळते. परंतु, जिल्हा रुग्णालयासह खासगी प्रयोगशाळांकडून दररोज जे स्वॅब घेतले जातात, त्यापैकी किती जणांचे अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आले, याची माहिती महापालिकेला दिली जात नाही. ही आकडेवारी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिकेकडून वेळोवेळी पाठपुरावा केला गेला. परंतु, प्रयोगशाळांनी माहिती सादर केली नाही. त्यामुळे नगर शहरातील पॉझिटिव्ह रेट नेमका किती आहे, याची माहिती उपलब्ध होत नव्हती. 

महापालिका आयुक्तांनी शहरातील डॉक्टर व प्रयोगशाळा चालकांची बैठक घेऊन याबाबत त्यांना वेळोवेळी सूचनाही केल्या होत्या. मात्र, खासगी प्रयोगशाळांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महापालिकेने जिल्हा रुग्णालयासह शहरातील नऊ खासगी प्रयोग शाळांना नियमित माहिती न मिळाल्यास परवाना निलंबित करण्यात येईल, अशा नोटिसा पाठविल्या आहेत.

COMMENTS