Homeताज्या बातम्यामनोरंजन

या जमिनीसाठी रणवीर दीपिकानं तब्बल 22 कोटी रुपये मोजले

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नेहमी आपल्या हटके लुकमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच या जोडीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं

शिवसेनेला मोठा धक्का; मंत्री उदय सामंत शिंदे गटात सामील? | LOK News 24*
राजकारणाचा उकीरडा
जमात-ए-इस्लामी हिंद बीडच्या वतीने मुख्याधिकारी नगर परिषद बीड यांना निवेदन

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण नेहमी आपल्या हटके लुकमुळे ते सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतात. अशातच या जोडीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. अलिबागमधील येथे 90 गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीसाठी मोजलेल्या रकमेचा आकडा ऐकून तुम्हीही अवाक व्हाल.

या जमिनीसाठी रणवीर दीपिकानं तब्बल 22 कोटी रुपये मोजले आहेत. या जागेच्या रजिस्ट्रेशनसाठी या जोडीनं नुकतीच अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयात हजेरी लावली होती.

जागेच्या काही कागदोपत्री कामाच्या पुर्ततेसाठी ते सोमवारी अलिबाग येथील रजिस्ट्रार कार्यालयात आले होते रणवीर-दीपिका आल्याचं समजताच रजिस्ट्रार कार्यालयाच्या बाहेर चाहत्यांची गर्दी पहायला मिळाली. आपल्या आवडत्या जोडीची झलक पाहण्यासाठी लोकांनी चांगलाच जमाव केला होता.

दरम्यान, अनेक कलाकारांनाही याठिकाणी जमिनी खरेदी केल्या आहेत. अनेकांना निसर्गाच्या सानिध्यात रहायला आवडतं म्हणून याठिकाणी जमिनी खरेदी करण्यावर कलाकारांचा कल पाहायला मिळतो.

COMMENTS