यंदा कार्तिका वारीला राज्यसरकारची परवानगी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यंदा कार्तिका वारीला राज्यसरकारची परवानगी

सोलापूर : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठया प्रमाणावर झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ऐन दिवाळी, दसरा या सण-उत्सावांत देखील रुग्

राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान… दररोज १५ लाख जणांचे होणार लसीकरण
शिक्षक व शिक्षकेतरांचे पगार दिवाळीपूर्वी होणार
माहीमचा किल्ला

सोलापूर : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठया प्रमाणावर झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. ऐन दिवाळी, दसरा या सण-उत्सावांत देखील रुग्ण संख्या कमी झाल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथील केले आहेत. तसेच यंदा पहिल्यांदाच पंढरीच्या पांडुरंगाची कार्तिकी वारी 15 नोव्हेंबरला होणार आहे. या कार्तिका वारीला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी परवानगी दिल्यामुळे वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोरोना निर्बंध शिथील केल्यामुळे यंदा मोठी गर्दी अपेक्षित असल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वारीसाठी स्वतंत्र परवानगीची गरज भासणार नसल्याचे आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले आहे. आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघ या प्रमुख वारींच्या निमित्तानं दरवर्षी पाच ते दहा लाख वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला येतात. राज्यात असलेल्या कोरोना संकटामुळे 17 एप्रिल 2020 पासून विठ्ठलाची एकही वारी भाविकांच्या उपस्थितीत होऊ शकली नाही. कोरोनाच्या दोन्ही लाटेत आषाढी वारीच्या निमित्तानं मानाच्या पालख्या एसटी बसेसमधून पंढरीत दाखल झाल्या होत्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. लसीकरण मोहिम वेगानं सुरू आहे. राज्यात 7 कोटींहून अधिक जणांना लस देण्यात आलेली आहे. त्यामुळे यंदाची वारी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.

COMMENTS