मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोनिकाताई राजळे आमची बहिण – प्रतापकाका ढाकणे

खरवंडी कासार प्रतिनिधी पाथर्डी तालुक्यातील भालगावातील नागरिकांनी गावातील गुणवंत भुमिपुत्राचा सत्कार ठेवण्यात आला होता, गावातील ज्या भूमिपुत्रांनी

नीट नाचता येत नाही का…म्हणत केली मारहाण
माजी सैनिकांचा सन्मान करून कारगिल विजय उत्साहात
गोळीबाराने कर्जत प्रांत कार्यालय हादरले

खरवंडी कासार प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यातील भालगावातील नागरिकांनी गावातील गुणवंत भुमिपुत्राचा सत्कार ठेवण्यात आला होता, गावातील ज्या भूमिपुत्रांनी विविध क्षेत्रात अधिकारी पदावर आपला ठसा उमटविला आहे अशा गुणवंतांचा सत्कार  भालगावातील नागरिकांनी  ठेवला होता.

यावेळी ढाकणे राजळे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले पाहून रामदास खेडकर अप्पर जिल्हाधिकारी यांनी दोघांनाही एकत्र बसण्यास आग्रह केला व त्यानंतर मोनिका आमदार मोनिका राजळे व ढाकणे सोबत बसले यावेळी त्यांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या चेअरमन प्रताप काका ढाकणे यांनी आमदार राजळे या भाऊबीजेच्या दिवशी एकत्र आलोत आमदार राजळे ही माझ्या बहिणी बहिण आहेत असा उल्लेख प्रताप काका ढाकणे यांनी केला .

यावेळी आमदार मोनिका राजळे यांनीही प्रताप काका ढाकणे यांना दिपावली च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रताप काका ढाकणे म्हणाले की पाथर्डी तालुका हा कष्ट करणारा तालुका आहे येथील युवकांनी आपल्या परिस्थितीवर मात देत विविध क्षेत्रात आपला आपल्या यशाला गवसणी घातली आहे असे गौरवोद्गार प्रताप काका ढाकणे यांनी काढले

आमदार मोनिका राजळे यांनीही पाथर्डी तालुका हा ऊसतोड अनेक  कामगाराचा तालुका म्हणून ओळख आहे येथील युवकांनी काबाड कष्ट करून ऊसतोड करून, असेल त्या परिस्थितीमध्ये यश मिळवले आहे

पाथर्डी तालुक्यातील युवक देशात अनेक ठिकाणी अधिकारी पदावर कार्यरत आहेत त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो

यावेळी रामदास महादेव खेडकर खाजगी सचिव महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अपर जिल्हाधिकारी यांनीही आपली प्राथमिक शाळेत शिकून खडतर परिस्थितीवर कशी मात करून आपण शिकलो त्यांचा जीवन प्रवास त्यांनी सांगितला व यापुढे मी भालगाव गावातील युवकांना नेहमीच मार्गदर्शन करणार आहे व भविष्यात त्यांना मदतही करणार आहे असे सांगितले यावेळी त्यांचा भालगाव करांच्या रामदास खेडकर अप्पर जिल्हाधिकारी परमेश्वर कासुळे तहसीलदार इगतपुरी नाशिक गणेश भंडारी शिक्षण अधिकारी शंकर जगन्नाथ खेडकर पीएसआय सिद्धार्थ सुरेश खेडकर परमेश्वर खेडकर वन अधिकारी सुरेश बापुराव कासुळे पीएसआय कांचन सुनील फुंदे शुभांगी गोरक्ष खेडकर मेडिकल ऑफिसर यांचा नागरी सत्कार केला

यावेळी अध्यक्षस्थानी ह भ प नवनाथ महाराज शास्त्री  मायंबा संस्थान,भालगांव अध्यक्षस्थानी होते प्रमुख उपस्थिती सभापती गोकुळ भाऊ दौंड मृत्युंजय गर्जे शिवशंकर राजळे अभय आव्हाड शिवशंकर राजळे गहीनाथ शिरसाट अर्जुन घायतडक , भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय किर्तने सोसायटीचे चेअरमन वामन कीर्तने कीर्तने.मिडसांगवीचे उपसरपंच विष्णू थोरात मुगुसवाडचे माजी सरपंच राजेंद्र हिंगे

या कार्यक्रमाचे आयोजन अंकुश कासुळे मित्र मंडळ यांनी केले होते

COMMENTS