मोठ्या बॅंकेत पत नसलेल्यांसाठी पतसंस्था – ना . डॉ . राजेंद्र शिंगणे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठ्या बॅंकेत पत नसलेल्यांसाठी पतसंस्था – ना . डॉ . राजेंद्र शिंगणे

साखरखेर्डा ( वार्ताहर ) राष्ट्रीय कृत बॅंक छोट्या व्यवसायीकांना कर्ज पुरवठा करीत नाही . कारण त्यांचे भांडवल कमी असते . त्या व्यवसायीकांना कर्ज पुर

मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाट्यावर उपोषण
पगार न झाल्याने एसटी कर्मचार्‍याची आत्महत्या
अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेच्या अध्यक्ष सचिव यांचे कट कारस्थान चालूच ?

साखरखेर्डा ( वार्ताहर )

राष्ट्रीय कृत बॅंक छोट्या व्यवसायीकांना कर्ज पुरवठा करीत नाही . कारण त्यांचे भांडवल कमी असते . त्या व्यवसायीकांना कर्ज पुरवठा करुन त्यांची पत वाढविण्याचे काम पत संस्था करतात असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी साखरखेर्डा येथील शारंगधर अर्बनच्या उद्घाटणा प्रसंगी केले .  

 मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय रायमुलकर यांनी स्थापीत केलेल्या शारंगधर अर्बन शाखा साखरखेर्डा चा शुभारंभ १५ आक्टोंबर रोजी करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य राम जाधव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी कृषी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य दिनकरराव देशमुख  , उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे , उपसभापती बंद्री बोडखे , माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील , माजी सरपंच महेंद्र पाटील , कमलाकर गवई , माजी सभापती राजू ठोके , साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव चंद्रशेखर शुक्ल , चिखली अर्बनचे संचालक विश्वनाथ जितकर , माजी उपसरपंच अस्लम अंजूंम  , तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शिवदास रिंढे  , रावसाहेब देशपांडे , शारंगधर अर्बन चे उपाध्यक्ष पंजाबराव मेटांगळे , कार्यकारी संचालक विजयकूमार धोंडगे , अर्जुन काटे , कैलास ढोलेकर , यासह शारंगधर अर्बनचे सर्व संचालक , सल्लागार संचालक उपस्थित होते . 

 ग्रामीण भागात व्यापारी बाजारपेठा वाढत चाललेल्या आहेत . राष्ट्रीय कृत बॅंका मात्र नाहीत . साखरखेर्डा येथे एकमेव बॅंक असून ती कर्ज पुरवठा पाहिजे तसा करीत नाही . अशावेळी पतस्ंस्था पुढे येत असून सुशिक्षित बेकार युवकांना मोठ्या प्रमाणात क्रेडीट कर्ज देत आहेत . देशात छाटा व्यवसायीक कधीच कर्ज बुडवित नाही . ते नियमीत कर्ज भरतात . म्हणूनच बुलडाणा अर्बन सारखी पत संस्था अशीया खंडात एकवर आहे . असेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले . यावेळी सर्वश्री संचालक नारायण काबरा , शिवशंकर तेजनकर , अंबादास सास्ते , शालीक डव्हळे , नागेश सोनुने , तोताराम गारोळे , शंकर ठाकुर , पंजाबराव घांडे , अंकीत धोंडगे , राजेश मानघाले , सो . रजनाताई संजय रायमुलकर , रेखा धोंडगे , ओमसेठ अग्रवाल , विकास इंगळे , राजेंद्र काटे , सुजित महाजन , राजेश एकनाथ शिंगणे , अशोक खरात , सुरेश तुपकर  , शे . जिकर इम्रान , शिवाजी लहाने , संदीप सुरुशे , गणेश काळे ,  , आशीष पोंधे , गणेश काळे , रविंद्र गुंजकर , आशीष बेंदाडे , श्रीकृष्ण खरात यांनी मोलाचे सहकार्य केले . प्रस्ताविक आ . डॉ . संजय रायमुलकर यांनी केले . संचालन कविवर्य तथा प्रख्यात निवेदक अजीम नवाज राही यांनी केले . 

COMMENTS