फुले शाहु आंबेडकरांचा वारसा नेटाने पुढे नेणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला साधुसंतांच्या वैचारिकतेची परंपरा आहे.हा देश दगडधोंड्यांचा असला तरी एकमेक
फुले शाहु आंबेडकरांचा वारसा नेटाने पुढे नेणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला साधुसंतांच्या वैचारिकतेची परंपरा आहे.हा देश दगडधोंड्यांचा असला तरी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी या दगडांचा वापर करण्याची आपली प्रथा नाही.महाराष्ट्राच्या संकृतीला आदर्श म्हणून वेगळी मान्यता आहे.या मान्यतेला बापाची जहागीर समजून सुरूंग लावण्याचा अधिकार ना राणे कुटूंबाला आहे ना ठाकरे परिवाराला.स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी सांडासारखा हैदोस करणाऱ्या प्रवृत्तींना हा महाराष्ट्र कधीच माफ करीत नाही.वळूंना वेसण घालण्याच्या कलेचे बाळकडू बांधावरच मिळते.अशा या महाराष्ट्रात राणे ठाकरे वादाला हाताळण्याची पुर्ण क्षमता आहे.
कुणी गाय मारली म्हणून आपण शेजारच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा जीव घेत नाही.हे आपले संस्कार आहेत.नेमक्या याच संस्काराची आठवण देऊन मामु म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांच्या वक्तव्यावर व्यक्त झालेल्या शिवसैनिकांच्या भुमिकेवर टिका केली आहे,फडणवीस किंवा भाजपाचे आऋले झाकून दुसऱ्याचे वाकून पाहण्यातच अधिक स्वारस्य असल्याचे वारंवार सिध्द झाले आहे फडणवीस यांची ही प्रतिक्रीया त्यातलीच.चंद्रकांत पाटील यांनीही शैलीच्या आड लपत राणे यांच्या बेलगाम वक्तव्याचे समर्थन केले आहे.अर्थात व्यक्ती कुणीही असो,पण ज्या पध्दतीने सध्या शाब्दिक हिंसा सुरू आहे,ती आपल्या मातीची संस्कृती नक्कीच नाही.राणे यांच्या वक्तव्यावर व्यक्त होताना शिवसैनिकांनी केलेल्या आणि प्रत्यूत्तरादाखल भाजपाकडून झालेल्या दगडफेकीतून झालेल्या हिंसेपेक्षाही शब्दांनी केलेली हिंसा भयानक आहे.त्याचे दुरगामी परिणाम संबंधितांना चुकवावे लागतील.कारण अशा हैदोसी प्रवृत्तींना वेसण कशी घालायची हे महाराष्ट्राला चांगले कळते.मुळात राणे ठाकरे या दोन परिवारात सुरू असलेला वाद हा तात्विक नाही.या वादाला रिजकीय सत्तेची किनार आहे.शिवसेना सोडल्यापासून राणे यांनी ठाकरे कुटूंबाला पाण्यात पाहतांना सोडलेली मर्यादा या वादाचे मुळ आहे.नेमके हेच मुळ काँग्रेसच्या मातीतून खोदून भाजपाने तो कंद आपल्या मातीत रूजविण्याचा प्रयत्न केला तोच मुळात शिवसेनेचा सुड घेण्यासाठी.हा प्रयोग भाजपाच्या पथ्यावर पडणार की अप्रत्यक्षपणे त्याचा शिवसेनेला फायदा होणार यावरही विचारावंतांचे मंथन सुरू झाले आहे. नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे हे वैर महाराष्ट्रासाठी तसे जुनेच आहे, उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक राणे शिवसेना पक्षप्रमुखांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत.भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री राणे विरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय.मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षरित्या फोडताना राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. दिल्लीहून परतल्यापासून राणे उद्धव ठाकरेंवर सातत्याने हल्ला चढवताना दिसून येत आहेत.राणे यांचा स्वभाव मुळातच आक्रमक आहे.याच आक्रमकपणातून शिवसेनेला त्याआनी अंगावर घेतले आहे., राणेंचा हा आक्रमकपणा शिवसेनेच्या पथ्यावर पडेल? राणेंचं उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक होणं शिवसेनेसाठी फायद्याचं आहे? यावर भाजपाच्या जेष्ठांनी विचार करावा इतपत राणे यांनी पातळी सोडल्याने भाजपाने घोडचूक तर केली नाही ना? असा नवा प्रश्न राजकारणात विचारला जात आहे.राजकारणात एकमेकांवर जाहीरपणे टिका करतांना अनेकांची जीभ घसरते.तथापी राणेंइतकी पातळी घसरून बोलणारे नेते तसे कमीच.राणे जेंव्हा ठाकरे परिवाराबाबत बोलतात तेंव्हा नळावर पाणी भरण्यावरून बायकांमध्ये झालेल्या भांडणाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही,एकूणच या मंडळींनी महाराष्ट्राला पाण्याचा नळ आणि स्वतःला बायकी केले आहे.इतपत ही पातळी घसरणार असेल साधू सांत फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्र संस्कृतीचा हा लिलाव थांबवण्यासाठी महाराष्ट्राला बाह्या सावरून मैदानात उतरावे लागेल.राजकारणात नितीमत्ता नावाची गोष्टच शिल्लक ठेवली नाही या मंडळींनी,राजकारण म्हणजे शेतावरचा बांध नाही,फणभर जमीनीसाठी आईबहिणीचा उध्दार करणाऱ्या भाऊबंधकीचे हे भांडण नाही,हा महाराष्ट्र या मंडळींच्या बापाची जहागीरही नाही.हे लक्षात घेऊन वावर करायला.फुले शाहु आंबेडकरांचा वारसा नेटाने पुढे नेणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्राला साधुसंतांच्या वैचारिकतेची परंपरा आहे.हा देश दगडधोंड्यांचा असला तरी एकमेकांची डोकी फोडण्यासाठी या दगडांचा वापर करण्याची आपली प्रथा नाही.महाराष्ट्राच्या संकृतीला आदर्श म्हणून वेगळी मान्यता आहे.या मान्यतेला बापाची जहागीर समजून सुरूंग लावण्याचा अधिकार ना राणे कुटूंबाला आहे ना ठाकरे परिवाराला.स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी सांडासारखा हैदोस करणाऱ्या प्रवृत्तींना हा महाराष्ट्र कधीच माफ करीत नाही.वळूंना वेसण घालण्याच्या कलेचे बाळकडू बांधावरच मिळते.अशा या महाराष्ट्रात राणे ठाकरे वादाला हाताळण्याची पुर्ण क्षमता आहे. अशा सांड वळूंना वेसण घालण्याची कला या महाराष्ट्राला अवगत आहे,हे त्यांनी लक्षात असू द्यावे.
COMMENTS