प्रतिनिधी : मुंबईसुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. २०१६ मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत काडीमोड घेत भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळा
प्रतिनिधी : मुंबई
सुरेश गंभीर हे शिवसेनेचे माजी आमदार होते. २०१६ मध्ये त्यांनी शिवसेनेसोबत काडीमोड घेत भाजपचे कमळ हातात घेतले होते. मात्र, बऱ्याच काळापासून ते भाजपवर नाराज होते. परिणामी ते भाजपमध्ये कधीच सक्रिय दिसून आले नाहीत.
सुरेश गंभीर यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सुरेश गंभीर आणि त्यांच्या दोन्ही कन्यांची शिवसेनेत घरवापसी होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत मोठ्याप्रमाणात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २०१६ साली माहीमचे माजी आमदार आणि भाजपचे विद्यमान नेते सुरेश गंभीर यांनी शिवसेनेतून भाजपात गेले होते.
मात्र आत ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा शिवबंधन बांधणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता मुंबईत पालिका निवडणुकीच्यादृष्टीने फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र गंभीर यांच्या जाण्याने भाजपला महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
सुरेश गंभीर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर यावर स्पष्टपणे बोलण्यास नकार दिला होता. परंतु, मी मनाने अजूनही शिवसैनिक असल्याचे सूचक विधानही त्यांनी केले होते.
सुरेश गंभीर यांनी २०१६ साली शीतल आणि शामल या आपल्या दोन मुलींसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. यापैकी शीतल गंभीर या सध्या वॉर्ड क्रमांक १८२ मधील भाजपच्या नगरसेविका आहेत.
तर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेल्या शामल यांचा पराभव झाला होता. आता या तिघांच्या घरवापसीमुळे राजकीय वतुर्ळात काय पडसाद, उमटणार हे बघावे लागेल.
COMMENTS