मुंबईत सातशे कोटींचा करघोटाळा  ; काँग्रेसचा सरकारला घरचा आहेर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत सातशे कोटींचा करघोटाळा ; काँग्रेसचा सरकारला घरचा आहेर

मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकार्‍यांच्या संगनमताने सुमारे सातशे कोटी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप

केजरीवाल आणि के. कविता यांच्या कोठडीत 7 मेपर्यंत वाढ
शेतकर्‍यांवरील संकट सरकार पुरस्कृत
छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेसह रिक्षाचालकाचा चोप | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधी :  मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागातील काही अधिकार्‍यांच्या संगनमताने सुमारे सातशे कोटी रुपयांचा घोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.  मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महापालिकेने तीव्र कारवाई सुरू केली आहे. जी दक्षिण विभागातील वरळी, परळ या भागात अनेक ठिकाणी मिलच्या मोक्याच्या व व्यावसायिक जागा आहेत. 

    या मिल मालकांकडून मालमत्ता करापोटी महापालिकेला कोट्यवधी रुपये येणे आहे; मात्र अधिकारी मालमत्ता कर आकारणी करताना व त्यांची देयके संबंधित जागा मालकांना पाठवताना त्यांच्या जागेचे आकारमान व त्यांचे मूल्य कमी दाखवतात. त्यामुळे त्यांचा मालमत्ता कर हा काही कोटींऐवजी काही लाखांत आकारला जातो. याचा मोठा आर्थिक फटका पालिकेला बसत असून संबंधित पालिका अधिकारी गब्बर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.  वरळी भागात मालमत्ता कर वसुलीत शंभर कोटी रुपयांचा, तर संपूर्ण मुंबईत 700 ते 800 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे केली आहे. जागा मालक, पालिका अधिकारी यांच्या संगनमताने हा 700-800 कोटींचा मालमत्ता कर वसुली घोटाळा झाला असून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कर प्रत्यक्षात फक्त काही लाखात वसूल झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

प्रशासनावर अंकुश नाही

राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असतानाही महापालिकेत मात्र काँग्रेसने शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेचा प्रशासनावर अंकुशच राहिलेला नाही, त्यामुळे कर्मचारी असे घोटाळे करीत आहेत. महापालिकेत चांगले काही काम झाले, तर त्याचे श्रेय स्वतः घेतात, स्वतःची पाठ थोपटतात. त्याप्रमाणे ही जबाबदारीही सत्ताधार्‍यांचीच आहे. विरोधी पक्षात असल्याने मुंबईकरांच्या भल्यासाठी असे भ्रष्टाचार उकरून काढतच राहू, असा इशारादेखील रवी राजा यांनी सत्ताधार्‍यांना दिला. 

COMMENTS