मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत वेगवान राजकीय घडामोडी… मुख्यमंत्री ठाकरे – शरद पवारांची बैठक

प्रतिनिधी : मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक घेतील. नक्षलग्रस्त

राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार
देशात परिवर्तनाची सुरूवात ः शरद पवार
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार

प्रतिनिधी : मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान गृहमंत्री अमित शहांसोबत बैठक घेतील. नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या राष्ट्रीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतरही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी शरद पवारांसोबत होत असलेली मुख्यमंत्र्यांची बैठक महत्वाची मानली जात आहे .

राज्याच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर पोहोचले . 

या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याची माहिती समोर आली. राज्यातील शाळांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात सादरीकरण होत असल्याची माहिती आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक होणार असल्याचे कळते.

तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर थेट टीका केली . यावर मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा होणार का? अशी चर्चा सुरु आहे .

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुळातच खंजीर खुपसून झाला आहे. 

दोन्ही काँग्रेस असूनही एकमेकांचे तोंड पाहात नाहीत, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथील एका कार्यक्रमात केला. गीते यांच्या या विधानाने राष्ट्रवादीच्या गोटात नाराजीचा सूर आहे .

COMMENTS