मुंबईतील कोरोनाचा वेग स्थिर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील कोरोनाचा वेग स्थिर

राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले असताना महानगरी मुंबईत कोरोनाचा वेग स्थिर झाल्याचे समाधानकारक चित्र आहे.

तणावमुक्त जीवन जगत नियमित व्यायाम केल्यास ह्र्दय विकाराचा धोका टळू शकतो:- डॉ.जगदीश हिरेमठ
सातारा पालिकेची अर्थसंकल्पीय आज होणार
मताधिक्य वाढविण्यासाठी कामाला लागावे

मुंबई/प्रतिनिधीः राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले असताना महानगरी मुंबईत कोरोनाचा वेग स्थिर झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. राज्यात नवे रुग्ण आढळून आल्याची दैनंदिन संख्या आठवड्याच्या सरासरीमध्ये 63 हजार आहे, तर दैनंदिन मृत्यूचे प्रमाण चारशेच्या पुढे आहे.  राज्यातील कोरोनाचा आठवड्याभरातील आलेख पाहिला तर रुग्णवाढीचा वेग कायम आहे; मात्र मुंबईत याउलट चित्र आहे. 

राज्यात 17 एप्रिलला 67 हजार नवे रुग्ण आढळले. 18 एप्रिल 68 हजार नवे रुग्ण झाले. 19 एप्रिलला 58 हजार नवे रुग्ण होते. 20 एप्रिलला 62 हजार नवे रुग्ण आणि 21 एप्रिल 67 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनावाढीचा दर चढत्या आलेखात आहेच; पण चिंतेची बाब म्हणजे बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 52 हजारावर स्थिर आहे. नवीन आढळलेले रुग्ण आणि बरे झालेले रुग्ण यात तफावत कायम असल्याने अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. हीच राज्यासाठी मोठी चिंतेची बाब आहे. बरे होणार्‍या रुग्णांचे प्रमाण वाढले तर रुग्णालयात बेड उपलब्ध होऊन नव्या रुग्णांवर उपचार करण सोपे होऊ शकते; पण गेला महिनाभर ही परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. मुंबईत बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण आणि नवीन आढळणारे रुग्ण यातील तफावत अत्यंत कमी राहिली आहे. या सर्व गोष्टी सकारात्मक आहेत; पण यासोबतच रुग्ण दुपटीचा दर 36 दिवसांवरून आता 48 दिवसांवर आला आहे. मुंबईतील आठवड्याची आकडेवारी पाहाता कोरोनावाढीचा दर स्थिरावला आहे. 18 एप्रिलला 8479 नवे रुग्ण सापडले, त्या तुलनेत 8078 बरे झाले. या दिवशी रुग्ण दुपटीचा दर 45 दिवस इतका होता. 19 एप्रिलला 7381 नवे रुग्ण त्या तुलनेत 8583 बरे झाले. या दिवशी 47 दिवस दुपटीचा दर वाढला. 20 एप्रिल 7214 नवे रुग्ण सापडले; पण त्यापेक्षा अधिक 9641 बरे झाले. 21 एप्रिल 7 हजार 684 नवे रुग्ण तर 6 हजार 790 बरे झाले तर रुग्ण दुपटीचा दर 48 दिवसावर गेला. फक्त 10 दिवसांत मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 36 वरून 48 झाला ही समाधानकारक बाब आहे. मुंबईप्रमाणे जोपर्यंत राज्यात बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण नवीन रुग्णांपेक्षा अधिक होत नाही, तोपर्यंत सरकारची चिंता कमी होणार नाही.

COMMENTS