Homeताज्या बातम्यामनोरंजन

माहित आहे काय ? अभिनेत्री मौनी रॉय कोणाबरोबर विवाह बंधनात अडकणार

अभिनेत्री मौनी रॉय (Mauni Roy) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. मौनी लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधणार असून हा भव्य विवाहसोहळा इ

वाईनविरोधात अण्णांनी पुकारला अखेर एल्गार ; 14 फेब्रुवारीपासून उपोषण इशारा
निसार शेख तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध
हिश्श्याच्या खुणा करण्यासाठी लाच घेणारी लिपिक कारागृहात

अभिनेत्री मौनी रॉय (Mauni Roy) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. मौनी लवकरच तिच्या प्रियकरासोबत लग्नगाठ बांधणार असून हा भव्य विवाहसोहळा इटली किंवा दुबई या दोनपैकी एका ठिकाणी होणार असल्याचे कळते.

मौनी पश्चिम बंगालमधील कूच बेहर या भागातील मूळ रहिवासी आहे. या ठिकणीसुद्धा तिच्या विवाह सोहळ्याचा एक कार्यक्रम पार पडेल. मौनीच्या भावाकडून मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2022 मध्ये तिचा आणि सूरजचा विवाहसोहळा पार पडेल. मौनीचा प्रियकर सूरज एक बँकर असून, तो व्यावसायिकही आहे. बंगळुरूतील एका जैन कुटुंबात त्याचा जन्म झाल्याचं सांगण्यात येतं. गेल्या बऱ्याच काळापासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते. सोशल मीडियावर अधून -मधून त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. अखेर त्यावरून पडदा उठला असल्याने मौनीच्या चाहत्यांमध्ये लग्नाची उत्सुकता लागून आहे .

COMMENTS