मालेगावचे माजी आ. आसिफ शेख रशीद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मालेगावचे माजी आ. आसिफ शेख रशीद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाात मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात ओला, उबेर टॅक्सी सेवा बंद
भ्रष्टाचार विरोधी नेत्याची, भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रवानगी !  
लसीकरणाच्या प्रश्‍नांवर आयुक्त व महापौर निरुत्तर ; मनपाच्या महासभेत वादावादीही रंगली

मुंबई/ नाशिक : राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाात मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी राज्याचे मंत्री व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माजी आमदार आसिफ शेख रशीद यांचे पक्षात स्वागत केले व मालेगावच्या विकासासाठी एकत्रित रित्या काम करू असे आश्वासन दिले. 

आसिफ शेख रशीद यांना आम्ही मालेगावच्या विकासासाठी संपूर्ण ताकद देऊ आणि त्यांच्या पाठीमागे पार्टी देखील उभी राहिल असे देखील मत भुजबळ यांनी व्यक्त केले.आसिफ शेख रशीद यांच्यासह १५ माजी नगरसेवकांनी देखील पार्टीमध्ये प्रवेश केला. कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रदेश कार्यालयात काही मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला… यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या सह माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे तसेच काही मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS