माजलगाव धरणाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजलगाव धरणाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे

माजलगाव तालुक्यातील सिंधफना नदीवरील धरणाला लोक नेते वसंतराव नाईक असे नाव देण्यात यावे अशी ,गोरसेना  महानायक ग्रुप माजलगाव यांनी बीड जिल्ह्याच्या खासद

पुरूषसूक्तातून पुरूषसत्ताकाचा उदय!
धावत्या कंटेनरचा टायर फुटल्याने अपघात
हलगर्जीपणा नको…


माजलगाव तालुक्यातील सिंधफना नदीवरील धरणाला लोक नेते वसंतराव नाईक असे नाव देण्यात यावे अशी ,गोरसेना  महानायक ग्रुप माजलगाव यांनी बीड जिल्ह्याच्या खासदार प्रितम मुंडे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. लोक नेते वसंतराव नाईक यांच्यामुळे माजलगाव हा तालुका ग्रीन बेल्ट झाला असून  शेतकऱ्याच्या जीवणात आमूलाग्र बदल झाला आहे , सदर धरण हे वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मंजूर झाले आहे,आणि  यापूर्वीही अनेक वेळा गोरसेना महानायक ग्रुप माजलगावच्यावतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे .त्यामुळे अशा हरित क्रांतीचे प्रणेते म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या लोक नेत्याच्या नावाने हा प्रकल्प असावा अशी आमची मागणी आहे.आणि ती आपण संबंधित यंत्रणेला निर्देशित करावे अशी विनंती गोर सेना माजलगाव ग्रुपच्या वतीने  करण्यात येत आहे.

COMMENTS