अभिनेते, दिग्दर्शक आणि बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांनी आगामी ‘दे धक्का 2’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला
अभिनेते, दिग्दर्शक आणि बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर(Mahesh Manjrekar) यांनी आगामी ‘दे धक्का 2’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन(Transformation) पाहून सर्वजण थक्क झाले. 2021 मध्ये त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रियासुद्धा झाली होती. बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री नेहा शितोळे(Neha Shitole) हिने नुकतेच सोशल मीडियावर महेश मांजरेकर यांच्यासोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमधील त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

COMMENTS