प्रतिनिधी : मुंबई शिवसेना आमदाराने थेट पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठा वाद निर्माण होण्याची
प्रतिनिधी : मुंबई
शिवसेना आमदाराने थेट पालकमंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीत मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मात्र सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही नेते जनतेतून निवडून आले आहेत.
त्यामुळे दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखावा, असा सल्ला राऊत यांनी भुजबळ आणि कांदेंना दिला आहे. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
राऊत म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील तिन्ही पक्षाचे सरकार उत्तमपणे वाटचाल करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी संयम राखणे गरजेचे आहे.
काही वाद विकोपाला गेलेला नाही. दोन्हीही नेते महाविकास आघाडीचेच आहेत. आघाडीतील नेत्यांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे.
छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांना जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आहे. छगन भुजबळ पालकमंत्री आहेत त्यांनी या आमदारांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळलं पाहिजे. तरुण मुलं आहेत
त्यामुळे सांभाळून घेतलं पाहिजे. चढाओढ अहंकार असता कामा नये तरच महाविकास आघाडीची चाकं पुढे जातील, असा सल्लाही राऊत यांनी भुजबळ आणि कांदे यांना दिला.
COMMENTS