महाराष्ट्र बंदला शेतकरी कामगार पक्ष बंदला पाठिंबा – भाई मोहन गुंड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र बंदला शेतकरी कामगार पक्ष बंदला पाठिंबा – भाई मोहन गुंड

बीड प्रतिनिधी  लखीमपूर खेरी येथील आंदोलनामध्ये शेतकरी नेत्याच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे, सर्व प्रकारच्या चिथावण्या झुगारून ग

Beed : “आंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं” जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात रिपाईचे आंदोलन| LOK News24
Beed :.विद्यार्थ्यांनीचे प्रेत खांद्यावर घेऊन नातेवाईकांनी नदी केली पार (Video)
Beed : परळी शहरातून तब्बल 140 गाढवं चोरीला (Video)

बीड प्रतिनिधी 

लखीमपूर खेरी येथील आंदोलनामध्ये शेतकरी नेत्याच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे, सर्व प्रकारच्या चिथावण्या झुगारून गेल्या दहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन अत्यंत शांततेत सुरू आहे, सरकारने पारित केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे व कामगार विरोधी संहिता आणि वीज सुधारणा विधेयक 2021 रद्द करण्याची मागणीसाठी, भारतीय शेतकरी कामगार पक्षाने  महाराष्ट्रातील आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे शेतकरी कामगार पक्ष बीडचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. 

लखीमपूर खेरी येथे झालेल्या निर्घृण हत्याकांडा प्रकरणी  मुक्त आणि निष्पक्ष तपास होण्यासाठी, केंद्रीय गृहमंत्री (एमओएस) अजय मिश्रा यांनी त्वरित राजीनामा द्यावा. पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींवर कसा दबाव आणला जातो धमक्या दिल्या जातात, 

तपास न्यायपालिकेच्याच देखरेखी खाली व्हावा  आणि सर्वोच्च/उच्च न्यायालयाच्या सिटिंग जज द्वारे तपासणी व्हावी या मागणीसाठ शेतकरी कामगार पक्ष ने ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला समर्थन दिले त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांनी बंदमध्ये  सहभागी होण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते भाई मोहन गुंड यांनी केल आहे,

COMMENTS