नगर प्रतिनिधी- महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला सुख सुविधा मिळवून देण्याचा अधिकार प्राप्त असला तरी जनतेला त्यांच्या मूलभूत सुविधा पासूनच दूर
नगर प्रतिनिधी-
महानगरपालिकेच्या माध्यमातून जनतेला सुख सुविधा मिळवून देण्याचा अधिकार प्राप्त असला तरी जनतेला त्यांच्या मूलभूत सुविधा पासूनच दूर ठेवलं जातं तर विकास वगैरे बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या .महानगरपालिकेचे पदाधिकारी , प्रशासन हे फक्त पगार घेण्यासाठीच महानगरपालिकेत येतात की काय अशी शंका आणि चर्चा नगरकरांच्या बैठकीत होते
कारण महानगरपालिकेतील प्रत्येक व्यक्ती आयुक्त ,उपायुक्त ,महापौर-उपमहापौर,सभागृहनेते,विरोधीपक्षनेते, नगरसेवक ,सभापती हे सर्व महानगरपालिका क्षेत्रामध्ये वावरत असतात पण ज्या अडचणी जनतेला भेडसावतात त्या अडचणी बाबत वरील सर्व जण डोळेझाक का करत असावेत हा मोठा प्रश्न. ज्या प्रकारे सरकार सांगतो मी जबाबदार किंवा माझं कुटुंब माझी जबाबदारी अशाच प्रकारे हे महानगर पालिका प्रशासन नगरसेवक पदाधिकारी असं का सांगत नसावेत की ” माझी महानगरपालिका माझी जवाबदारी ” , ” माझा मतदार संघ माझी जबाबदारी ” , “माझे नागरिक माझी जबाबदारी ” .
या सर्व गोष्टी सर्वसामान्यांना सुचतात पण प्रशासन डोळेझाक करतो हे दुर्दैव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून प्रशासनाला जाग आणून देण्यासाठी महानगरपालिकेचे सर्वो सर्वा असलेले प्रशासकीय अधिकारी आयुक्त साहेब यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध म्हणून त्यांना ” गांधारी रत्न ” हे पुरस्कार देऊन नगरकरांची तळतळ दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे .कारण डोळे असुनही आंधळे पणाचं सोंग हे प्रशासन घेत आहे. या बाबतीत लोकांनी आरडाओरड सुरू केली सोशल मीडियाच्या माध्यमातून खंत व्यक्त करण्यासाठी भावना मांडल्या लोकांच्या दवाखान्याच्या वाऱ्या वाढल्या ,
लोकांना पाठीचे मणक्याचे गुडघ्याचे व मानेचे आजार उद्भवयाला लागले तरी प्रशासनाला जाग येण्याची लक्षणं दिसत नाही. लोकांच्या वाहनांची देखील मोठे नुकसान होत आहे सारख्या नुकसानाला सर्वसामान्य लोक देखील वैतागलेल्या आहेत त्याच प्रमाणे महानगरपालिकेची शहर बससेवा देखील या खड्ड्यांचा शिकार झालेले आहे कारण खड्ड्यांच्या रस्त्यावरून जाऊन जाऊन त्या गाड्यांचा खिळ खिळा झालेला आहे. तर आमची प्रशासनाला एक मागणी आहे ही बससेवा रद्द करून ” शहर ट्रक सेवा ” चालू करावी जेणेकरून अशा रस्त्यांमधून जाताना ट्रक सारखे वाहन उपयुक्त असून नागरिकांच्या जिवाला देखील धोका होणार नाही.
लोकांच्या मनात भडकलेली आग विझवण्याचा नाटक करण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधींकडून करण्यात आला पण डांबरी रस्त्यावर किंवा सिमेंट काँक्रेट च्या रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम भरून कसे काय बुजवू शकतात? ही शक्कल नेमकी कशासाठी म्हणजे आधी मुरूम चे कंत्राट काढायचे नंतर डांबरी खड्डे बुजवण्याचे कंत्राट काढायचे त्यानंतर रस्त्याचे कंत्राट द्यायचे हे सर्व नियोजन बद्ध कारभार आहे की काय अशी शंका मनात यायला लागली आणि याला सर्व जण मिळून मिसळून काम करताय हे नक्की.
खड्ड्यांच्या नावावर पैसे खाण्याची जणू काय स्पर्धाच याठिकाणी लागलेली दिसते नगरकरांच्या भावनेचा अंत पाहू नका आज फक्त निषेधार्थ आंदोलन केले यापुढे येत्या आठ दिवसात जर सर्व व्यवस्थित खड्डे बुजवण्यात आले नाही तर खळखट्याक च्या पलीकडे जाऊन देखील आम्ही काम करू शकतो याची दखल प्रशासनाने घ्यावी.यावेळी जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा ,आदेश गायकवाड, प्रकाश गायकवाड , संकेत जरे,ओंकार काळे,अनिकेत शियाळ उपस्थित होते.
COMMENTS