मलकापूर शहरात फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी कराड शहरात

Homeमहाराष्ट्रसातारा

मलकापूर शहरात फुटलेल्या पाईपलाईनचे पाणी कराड शहरात

कोल्हापूर नाका येथे मलकापूर हद्दीत असणार्‍या गोकाक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले.

दिव्यांगांसाठीचे कायदे मर्यादित करू नका
पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक
आदित्य ठाकरे वाघ, पण मटण खायच्याऐवजी डाळ भात खाताहेत.

गोकाक पाणीपुरवठा संस्थेची पाईप फुटल्याने रस्त्यांला ओढ्याचे रूप

कराड / प्रतिनिधी : कोल्हापूर नाका येथे मलकापूर हद्दीत असणार्‍या गोकाक पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यांवर वाहून गेले. पाईपलाईन फुटल्याने मलकापूर शहराच्या हद्दीतील पाणी कराड शहराच्या हद्दीत कोल्हापूर नाका येथील रस्त्यावरून वाहत असल्याने लोकांनी पाहण्यास गर्दी केली होती. अचानक रस्त्यांवर आलेल्या पाण्याने रस्त्याला ओढ्याचे रूप आले होते.

मलकापूर हद्दीतील शास्त्रीनगर येथील श्री पाटील टायर्स दुकानामागून गोकाक पाणी पुरवठ्याची पाईपलाईन गेली आहे. ही पाणीपुरठा संस्था सन 1966 पासून सुरु आहे. दोन किलोमीटर अंतरावर पाईपलाईन नेण्यात आली आहे. पूर्वी 2 हजार हेक्टर शेतीचे क्षेत्र या योजनेमुळे ओलीताखाली येत होते. सध्या 1100 हेक्टर शेती क्षेत्र ओलिताखाली येत आहे. गोकाक पाणी पुरवठ्याची पाईपलाईन यापूर्वी 13 वर्षापूर्वी फुटलेली होती. यानंतर आज पाईप फुटल्याने रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणीपातळी वाहत होती. त्यामुळे वाहनचालकांना तसेच व्यापारी लोकांना याचा त्रास सहन करावा लागला.

गोकाक पाणीपुरठा संस्थेची पाईपलाईन फुटल्याची माहिती मिळताच संस्थेचे सुरेश जाधव व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाईप फुटली त्यावेळी लाईट गेल्याने पाणी वाहण्याची क्षमता कमी होती. अन्यथा अजून लोकांचे नुकसान झाले असते. पाईपलाईन दुरूस्तीसाठी लाखांत खर्च असून संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. लोकांनी रस्त्यांवरून वाहणारे पाणी बघण्यासाठी गर्दी केली होती.

COMMENTS