मध्य भारतात केवळ 88 सारस पक्षी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य भारतात केवळ 88 सारस पक्षी

अवैध शिकारीमुळे सारस पक्षी भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. देशात 2000 साली भारतात सारस पक्ष्याच्या फक्त 4 जोड्या शिल्लक राहिल्या होत्या.

मुंबई विमानतळावर साडेचार कोटीचे सोने जप्त
शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 
मच्छीमारांना कोळीवाड्याकडून आर्थिक साह्य

गोंदिया : अवैध शिकारीमुळे सारस पक्षी भारतातून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. देशात 2000 साली भारतात सारस पक्ष्याच्या फक्त 4 जोड्या शिल्लक राहिल्या होत्या. संपूर्ण महाराष्ट्रात सारस पक्षी गोंदिया आणि जिल्ह्याच्या सीमा भागात आढळतो. सारस गणनेनुसार मध्य भारतात 88 सारस पक्षी आढळले. ही चिंतेची बाब आहे. सारस संरक्षणासाठी शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांसह प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बहेकार यांनी व्यक्त केले. 

गोंदिया येथील सेवा संस्थेमार्फत गोंदिया,भंडारा आणि मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात सारस गणना केली जाते निसर्ग प्रेमी सावन बहेकर यांनी सांगितले की, दरवर्षी ते पाहाणी व निरीक्षण करतात. यावर्षी केलेल्या पाहाणीत गोंदिया जिल्ह्यात 39, भंडारा जिल्ह्यात 2 आणि मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात 47 सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली. यावर्षी 13 ते 18 जून या कालावधीत झालेल्या गणनेत दररोज 70 ते 80 ठिकाणांवर पहाटे 5 ते सायंकाळपर्यत गणना व निरीक्षण करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यासाठी 23, बालाघाटसाठी 18 व भंडाऱ्यासाठी 4 चमू तयार करण्यात आल्या होत्या. साधारणत: जुलै ते ऑगस्ट सारस पक्ष्याचा प्रजननाचा काळ असतो. विशेष म्हणजे सारस धानाच्या शेतात घरटे करून त्यात अंडी घालतात. सारस पक्षी शेतात अंडी घालण्याचा फायदा शेतमालकालाही होतो. कारण धानाच्या शेतात असणारे विविध कीटक खात असल्याने धान्यावर कोणतेही रोगराई येत नाही. शिवाय कीटकनाशकांवरील खर्च वाचतो. महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हा सारसर पक्ष्यांसाठी ओळखला जातो. जिल्ह्यात 2018 मध्ये 34 सारस होते. तक 2019 मध्ये 44 त्यात वाढ होऊन 2020 मध्ये ही संख्या 46 झाली तर यंदा 2021 मध्ये यात आश्चर्यकारकपणे घट होऊन 39 सारस पक्ष्यांची नोंद आली.

वजनदार अंडी

पायाची नखे ते चोच असा किमान साडेपाच ते सहा फूट उंचीचा हा अत्यंत देखणा पक्षी. विस्तीर्ण पंख विखुरले तर तब्बल चौदा ते सोळा फुटांपर्यंत रुंद..! भात शेतातच स्वत:चे घर करणारा आणि त्यामध्ये किमान तीन ते चार किलो वजनाची अंडी घालतो. गम्मत म्हणजे अंडी उबवण्याचा अधिकार फक्‍त मादीचाच या निसर्ग नियमालाही छेद देत सारसामध्ये नर सारस अंडी उबवतो.

एकाच जोडीदाराबरोबर सहजीवन

रामायणासह इतर प्राचिन ग्रंथांमध्ये सारस पक्ष्याचा उल्लेख आढळतो. सारस पक्षी नेहमी जोडीने राहतो आणि फिरतो. एकाच जोडीदाराशी एकनिष्ठ असलेला सारस जोडीदाराला मरेपर्यंत सोडत नाही. दोघांपैकी एकाच मृत्यू झालातर दुसरा अन्नपाणी वर्ज्य करून प्राणत्याग करतो. असे म्हणतात कि एकमेकांशी अजिबात न पटणाऱ्या पती-पत्नीला सारस पक्ष्याच्या सान्निध्यात ठेवण्याची प्रथा भारतात एकेकाळी होती.

शिकारीमुळे घटली संख्या

गोंदियातील सेवा संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी सांगितले की, शेतकरी धानावर प्रसंगी बंदी असलेल्या घातक किटकनाशकांची फवारणी करतो. ही कीटकनाशके सारस पक्ष्यांच्या पिलांसाठी प्राणघातक ठरीत आहे. त्यामुळे दरवर्षी किमान चार ते पाच पिले मृत्यूमुखी पडतात, शिवाय विष प्रयोग, इलेक्ट्रिक शॉक व शिकारीमुळे संख्या कमी होत आहे. पक्षीप्रेमी व शेतकऱ्यांनी संवर्धनासाठी आणखी सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत बाहेकर यांनी नोंदवले.

COMMENTS