मध्यप्रदेशात भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्यप्रदेशात भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये मंगळवारी सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत.

कोपरगाव तालुक्यातील गावांसाठी 9 कोटी रुपये निधी मंजूर
छगन भुजबळ हे नेते नव्हे, तर, ओबीसींच्या शोषकांचे हस्तक ! 
मलिकांची अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच होणार स्पष्ट

ग्वाल्हेर : मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर शहरामध्ये मंगळवारी सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची धडक होऊन झालेल्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 4 लाख करुये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

पोलीस निरिक्षक रवी भदोरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्वाल्हेर शहरातील जुनी छावणी परिसरात मंगळवारी सकाळी बस आणि आटोरिक्षाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आटोरिक्षाचा चालक आणि रिक्षामधील 9 महिलांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तीन जणांचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. भदोरिया यांनी सांगितले की, अपघाताच्या वेळी आटोरिक्षामध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. रिक्षामध्ये प्रामुख्याने महिला प्रवासी होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या मुरैनाकडे निघालेल्या बसने रिक्षाला समोरुन धडक दिली. सध्या पोलिस मृतकांची ओळख पटवण्याचे काम करीत असल्याचे भदोरिया यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री चौहान यांनी ट्विटरवरुन घडलेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला. “ग्वाल्हेरमध्ये बस आणि रिक्षाची धडक झाल्याने घडलेल्या अपघातामध्ये अनेकांचे प्राण गेल्याची माहिती मिळाली. मी इश्वराकडे प्रार्थना करतो की या मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी. तसेच या मृतांच्या नातेवाईकांना हा धक्का सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो,” असं ट्विट चौहान यांनी केले आहे. तसेच सरकार आणि मध्य प्रदेशमधील जनता या दु:खद प्रसंगी मृतकांच्या कुटुंबियांसोबत आहे. त्यांनी स्वत:ला एकटे समजू नये. मध्य प्रदेश सरकारच्यावतीने मृतकांच्या कुटुंबाला 4 लाखांची तर जखमींना मदतनिधी म्हणून 50 हजार रुपयांची मदत केली जाईल,” अशी माहितीही चौहान यांनी दिली.

COMMENTS