भातकुडगाव फाटा प्रतिनिधी गावच्या विकास कामात मताचे राजकारण न करता विकास कामाला नेहमीच
भातकुडगाव फाटा प्रतिनिधी
गावच्या विकास कामात मताचे राजकारण न करता विकास कामाला नेहमीच प्राधान्य देऊन आपण काम करत आहोत तळागाळातील माणसापर्यत भारतीय जनता पक्षाचे विचार पोहचले पाहिजे हेच ध्येय डोळयासमोर ठेऊन काम करत असल्यामुळे आपणाला विकास कामाचा डोंगर उभा करता येतो त्यासाठी मताचे राजकारण करणार नाही असे स्पष्ट मत शेवगाव – पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे भायगाव ते बाबुराव दुकळे वस्ती व हिंगणगावने येथे मारुती मांदिरासमोरील सभामंडपाचे भूमीपुजनानंतर भायगाव येथे आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी विचार मंचावर भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, माहिला तालुकाध्यक्षा आशाताई गरड, वाय. डि. कोल्हे, बापुसाहेब पाटेकर, उमेश भालसिंग, उदय शिंदे,कचरू चोथे, भिमराज सागडे, संदिप खरड, गंगा खेडकर, सुभाष बरबडे, तापडिया महाराज,जेष्ठ पत्रकार शाम पुरोहित उपस्थित होते. शेतकऱ्यांनी खचुन न जाता धर्याने उभे राहावे शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वृध्देश्वर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा पर्याय आहे.आपल्या सुखदुःखाला धावुन येणाऱ्याच्या पाठीशी नेहमी उभे राहुन भारतीय जनता पार्टीला यापुढील काळात भरभक्कम साथ द्यावी असे आव्हान त्यांनी यावेळी केले.
यावेळी भायगावचे सरपंच हरिभाऊ दुकळे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी चेअरमन गणपत आढाव, अशोक देशपांडे, नानासाहेब दुकळे, पांडुरंग लटपटे, माणिक शेकडे, हरिचंद्र आढाव, अनंता देशपांडे, संजय सौदागर, डॉ.शाम काळे, रमेश कळमकर, नवनाथ फासाटे, सोपान वडणे, विठोबा वाघमोडे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक देशपांडे यांनी केले तर आभार संतोष आढाव यांनी मानले.
COMMENTS