मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री अनिल परब यांची चौकशी सुरू

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

इंधनाच्या करात कपात व्हावी
बाबरी, गोध्रा संबंधित सर्व खटले होणार बंद :सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
मविआ एकत्र निवडणूका लढवणार ः खा. शरद पवार

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी अनिल परब यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाने चौकशी समिती नेमून परब यांच्या साई रिसोर्ट बांधकाम प्रकरणी अहवाल जिल्हा प्रशासनाला पाठवण्याचे आदेश दिले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी यासंबंधी लेकी तक्रार दाखल केली होती, त्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परब यांच्या या रिसॉर्टचे बेकायदेशीर बांधकाम झाले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाहीतर परब यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. त्यानुसार आता चौकशीचे आदेश देण्यात आले असून यामुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

COMMENTS