भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान

अहमदनगर (प्रतिनिधी)-  देशातील भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने महात्मा गांधीजी

पंतप्रधानांना भावली हिवरेबाजारची कोरोनामुक्ती गाथा
बाबासाहेब शेलार यांचा नागरी सत्कार
पुरुषवाडी व वांजुळशेत शाळेची अव्वल कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- 

देशातील भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी कायमची संपवण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने महात्मा गांधीजी यांच्या जयंती दिनी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान सुरु करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी बलिदान देऊन ब्रिटीशांच्या ताब्यातून देशाला मुक्त केले. देशात लोकशाही अस्तित्वात येऊन केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय व भारतीय संविधान हे श्रेष्ठ बनले. परंतु वुई द पीपल ही शक्ती सर्वोच्च आहे. देशातील शासन-प्रशासनावर लक्ष ठेवण्याची आणि त्यांच्याकडून भ्रष्टाचार, अनागोंदी, टोलवाटोलवी या सर्व बाबींना लगाम लावण्यासाठी संघटनेने ऑल टाइम ऑब्जर्वेक्षण आणि ऑल टाईम अ‍ॅक्शन हे तंत्र या अभियानाच्या माध्यमातून स्विकारणार आहे. होईल ते होऊ द्या, मला काय त्याचे? ही मकात्या प्रवृत्ती गेली 75 वर्षे देशभर मोठ्या प्रमाणात पसरली आहे. कॉन्टम फिजिक्समध्ये मध्ये ऑब्जर्वर इफेक्ट हा सिद्धांत महत्त्वाचा आहे. त्याचा वापर शासन-प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी तमाम जनता करू शकते. परंतु मला काय त्याचे? या प्रवृत्तीमुळे शासन प्रशासनातील भ्रष्ट अकार्यक्षम प्रवृत्ती वाढीस लागली असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी पध्दतीने वागणार्‍या लोकांना किंवा संस्थांना संघटनेच्या वतीने ढब्बू मकात्या घोषित केले जाणार आहे. तर त्यांचे सत्य समोर आणण्यासाठी ढब्बू मकात्या सत्यांजली अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे प्रारंभ दि.2 ऑक्टोबरला वाडियापार्क येथील महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन केले जाणार आहे.  

ढब्बू मकात्या प्रवृत्तीमुळे अनेक लोक सार्वजनिक निवडणुकित योग्य उमेदवारांना मत देत नाहीत. काही पैसे व जातीच्या आहारी जातात, तर काही मतदानाचा हक्क बजावत नाही. त्यामुळे वोट माफियांचे फावते आणि मागच्या दाराने ते सत्ता मिळवतात. ढब्बू मकात्या वृत्ती लोकशाहीला लागलेला कॅन्सर आहे. ढब्बू म्हणजे पूर्वीचे अतिशय सुमार किमतीचे नाणे होते तर मकात्या म्हणजे मला काय त्याचे? ही प्रवृत्तीचा उदासीन नागरिक सिध्द करत असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. ढब्बू मकात्या सत्यांजली अभियानासाठी अ‍ॅड. गवळी, कॉ. बाबा आरगडे, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, ज्ञानदेव काळे, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.    

COMMENTS