भाळवणीत अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाळवणीत अवैध दारूसह 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या भाळवणी शिवारामध्ये होत असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर नगर व पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्

डेल्टाचे जिल्ह्यात आढळले चार रुग्ण
माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…
कोकणवासियांसाठी धावणार ’मोदी’ एक्सप्रेस l DAINIK LOKMNTHAN

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर-कल्याण महामार्गावर असलेल्या भाळवणी शिवारामध्ये होत असलेल्या अवैध मद्य वाहतुकीवर नगर व पुण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकून सुमारे 22 लाख रुपये मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमध्ये गोवा राज्य निर्मित विदेशी मद्य साठा, दोन चारचाकी, एक सहाचाकी ट्रक जप्त केला आहे. तसेच दीपक राधु गुंड, (वय 39, रा.वडगाव गुंड,ता.पारनेर जि.नगर), प्रकाश बाबाजी शेळके, (वय 34, रा.कवाद कॅम्प,निघोज,ता.पारनेर,जि.नगर) या दोघांना अटक करण्यात आली असून, राजू उर्फ राजेंद्र शिंदे हा या गुन्हयातील मुख्य सूत्रधार फरार आहे.
याबाबतची माहिती अशी की नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी येथे अवैधरित्या गोवा राज्य निर्मित मद्याची वाहतूक होणार असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावून एक टाटा कंपनीचा 1613 मॉडेलचा सहा चाकी ट्रक (क्र. एमएच 14 एएस 9531), एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट चारचाकी वाहन (क्र. एमएच 16 एमआर 9631) व एक मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट डिझायर वाहन (क्र. एमएच 04 ईडी 3585) अशा तीन वाहनांमध्ये गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीस प्रतिबंधीत असलेले विदेशी मद्य, दोन मोबाईल व इतर साहित्य असा मुद्देमाल आढळल्याने वाहनासह एकूण अंदाजे 21 लाख 91 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप व पुणे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे अधीक्षक गणेश पाटील, उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे व संजय सराफ, पुणे विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिंगबर शेवाळे, भरारी पथक क्र. 1 विभागाचे निरीक्षक ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक वर्षा घोडे, विजय सूर्यवंशी, महिपाल धोका, गोपाल चांदेकर, विभागीय भरारी पथकातील दुय्यम निरीक्षक एस.की. बोधे व एस. आर. गायकवाड, सहाय्यक दुय्यम निरीक्षक आर.व्ही. चव्हाण, व्ही. एन. रानमळकर, आर. एम. पारधे व जवान अहमद शेख, भरत नेमाडे, सतीश पोंदे, प्रताप कदम, अमर कांबळे, दिगंबर ठुबे, उत्तम काळे, नंदकुमार ठोकळ, प्रवीण सागर, दिलीप पवार, अविनाश कांबळे, अंकुश कांबळे, वाहन चालक संपत बिटके, पांडुरंग गदादे व महिला जवान रत्नमाला काळापहाड यांनी केली आहे.

श्रीरामपूर व राहात्यात छापे
नगर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने श्रीरामपूर व राहाता परिसरामध्ये हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकले. या कारवाईत साधना मोहन काळे, छाया सोनाजी शिंदे यांना अटक करण्यात आली असून, एक अज्ञात व्यक्ती फरार झाला आहे. राज्य उत्पादन शुल्क, श्रीरामपूर, कोपरगाव व संगमनेर विभागांनी संयुक्त कारवाई करून मोठया प्रमाणात श्रीरामपूर व राहाता येथील हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर धाडी टाकून हातभट्टी दारुसाठी लागणारे 4 हजार 870 लिटर रसायन, 83 लिटर गावठी दारु व इतर असा 1 लाख 16 हजार 900 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

COMMENTS