वेब टीम : दिल्ली अलीकडच्या काळात बुध्दिबळात (Chess) भारताने चांगला दबदबा केलेला आहे आणि आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तबही झाले आहे. विश्वनाथन आन
वेब टीम : दिल्ली
अलीकडच्या काळात बुध्दिबळात (Chess) भारताने चांगला दबदबा केलेला आहे आणि आता त्यावर अधिकृत शिक्कामोर्तबही झाले आहे.
विश्वनाथन आनंदच्या विश्वविजेतेपदानंतर आपले झपाट्याने वाढलेले ग्रँडमास्टर आणि महिला ग्रँडमास्टर ह्यानंतर आता बुध्दिबळाच्या महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही आपण झेंडा रोवला आहे.
भारतीय महिलांनी या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत धडक मारुन रौप्यपदकाची कमाई केली आहे आणि हे रौप्यपदक म्हणजे महिलांच्या वर्ल्ड टीम चेस चॕम्पियनशीपमधील भारताचे पहिलेच पदक आहे.
केवळ रशियन संघच भारतीय महिलांना यात वरचढ ठरला. भारतीय महिलांनी या स्पर्धेत केवळ दोनच गेम गमावले आणि हे दोन्ही रशियाविरुध्दच होते.
स्पेनमधील सिटजेस येथे ज्या भारतीय संघाने हे पहिलेवहिले यश मिळवले त्यात हरिका द्रोणावल्ली, तानिया सचदेव, मेरी अॕन गोम्स, आर. वैशाली आणि भक्ति कुलकर्णी यांचा समावेश होता.
रशियन महिलांनी आपले विश्वविजेतेपद कायम राखले. त्यांनी पहिला सेट 2.5- 1.5 असा जिंकला तर दुसरा सेट 3-1 असा जिंकला.
COMMENTS