भारतीय जनता पक्षाच्या वतीने  तालुका भरात वृक्षारोपण – स्नेहलताताई कोल्हे.

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

भारतीय जनता पक्षाच्या वतीने तालुका भरात वृक्षारोपण – स्नेहलताताई कोल्हे.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आणि कोपरगांव मतदार संघात

जिल्ह्यात अजून सहा पोलिस ठाणी होऊ शकतात…; प्रस्ताव शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, राजकीय ताकद लावण्याची गरज
विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग ; 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू | Lok News24
*तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २८ जून २०२१ l पहा LokNews24*


कोपरगांव शहर प्रतिनिधी –हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळाला सात वर्षे पुर्ण झाल्याबद्दल आणि कोपरगांव मतदार संघात कोरोना महामारीच्या संकटातुन कोरोनाबाधीत रुग्ण बरे झाल्याबद्दल संपुर्ण कोपरगांव विधानसभा मतदार संघात दिनांक ५ जुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपणांची मोहिम हाती घेण्यांत येणार असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव,माजी आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी दिली.
पुढे त्या म्हणांल्या की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हितकारी निर्णय घेवुन सुराज्य चालविले त्याची आठवण म्हणून ६ जुन रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा सर्वत्र साजरा होत आहे. त्याचप्रमाणे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात वर्षाच्या कार्यकाळात जनविकासाच्या असंख्य निर्णयाची महत्वकांक्षी अंमलबजावणी करत कोरोना महामारीत अनेक महत्वपुर्ण निर्णय घेतले आहेत. भारतीय जनता पक्षाने शेवटच्या घटकापर्यंतचा जाणिवपुर्वक विचार करून त्यांच्या उत्कर्षासाठी सतत काम सुरू ठेवलेले आहे.त्याचप्रमाणे दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून  जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, वृक्ष संतुलन राखले जावे पर्यावरण जोपासले जावे यासाठी संपुर्ण् कोपरगांव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहिम राबविली जाणार आहे. गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगासह राज्यातही कोरोनाने थैमान घातलेले असून कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती त्याचा विचार करुन संपूर्ण मानव जातीने नैसर्गिक संपत्ती जोपासणे गरजेचे असून याकरीता वृक्ष संवर्धन ही काळाची  खरी गरज आहे त्यामुळे येणा-या पिढीसाठी आपण निश्चितच योगदान देऊ शकतो या भावनेने उपक्रमामध्ये सर्वांनींच सहभागी व्हावे असे आवाहन सौ.कोल्हे यांनी केले आहे

COMMENTS